वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या राजस्थान रॉयल्सच्या सलामी जोडीनं अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड रेकॉर्डसह नवा इतिहास रचला आहे.
आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी चेंडूत ५०० धावा करण्याचा नवा विक्रम वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वालनं आपल्या नावे केला आहे.
वैभव आणि यशस्वीनं २४८ चेंडूत ५०० धावांची भागीदारी रचत आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलदगतीने ५०० धावांची भागीदारी रचण्याचा नवा रेकॉर्ड सेट केला आहे.
वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या जोडीनं गत हंगामापासून गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यापर्यंत २८४ चेंडूत ५८७ धावा केल्या आहेत. या दोघांनी फक्त ९ डावात हा डाव साधला असून यात एका शतकी भागीदारीचाही रेकॉर्ड आहे. १६६ ही या जोडीची सर्वोच्च भागीदारी आहे.
९ डावात या जोडीनं ५ अर्धशतकासह एका शतकी भागीदारीच्या जोरावर आयपीएलमधील नंबर वन जोडी असल्याचे दाखवून दिले आहे. फक्त तीन डावात या जोडीला अर्धशतकी भागीदारी रचता आलेली नाही.
गुजरात टायटन्सविरुद्ध वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल जोडीनं ३८ चेंडूत ७० धावांची भागीदारी रचली. यात यशस्वी जैस्वालनं अर्धशतकाला गवसणी घातली.
याआधी हा विक्रम गौतम गंभीर आणि विरेंद्र सेहवाग या जोडीच्या नावे होता. दिल्ली डेयरडेविल्स (सध्याचा दिल्ली कॅपिटल्स) संघाकडून या दोघांनी ३०९ चेंडूत ५०० धावांची भागीदरी रचल्याचा विक्रम होता.
गत हंगामापासून ही जोडी आयपीएलमध्ये धुमाकूळ घालत असून यंदाच्या हंगामातही दोघेही डावाला दमदार सुरुवात करुन देत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचताना दिसत आहेत.