Join us
Daily Top 2Weekly Top 5

Unwanted IPL Record : टीम इंडियात घेतलं; त्यालाच धु धु धुतलं! IPL मध्ये नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड

By सुशांत जाधव | Updated: May 16, 2026 17:07 IST

Open in App
1 / 6

IPL च्या यंदाच्या हंगामात गोलंदाजीत दमदार कामगिरी करणाऱ्या अंशुल कंबोज याला बीसीसीआयने मोठं बक्षीस दिलं. श्रीलंका दौऱ्यावरील तिरंगी वनडे मालिकेसाठी त्याची इंडिया 'अ' संघात वर्णी लागली.

2 / 6

आयपीएलमध्ये पर्पल कॅपच्या शर्यतीत असणाऱ्या या गोलंदाजावर CSK च्या संघाला प्लेऑफ्स तिकीट मिळवून देण्याची मोठी जबाबदारी आहे. पण टीम इंडियात वर्णी लागल्यावर लखनौ विरुद्धच्या सामन्यात त्याची चांगलीच धुलाई झाली.

3 / 6

LSG विरुद्धच्या सामन्यात २.४ षटकात म्हणजे फक्त १४ चेंडूत त्याने ८ षटकार आणि ३ चौकारासह ६३ धावा खर्च केल्या. एका सामन्यात सर्वाधिक षटकार देणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत यश दयालसोबत तो संयुक्तरित्या अव्वलस्थानी आहे.

4 / 6

२०२३ च्या हंगामात गुजरात टायटन्सच्या ताफ्यातून यश दयाल याने कोलकाता नाईट विरुद्धच्या सामन्यात ८ षटकार खाल्ले होते. यात रिंकू सिंह याने एका षटकात मारलेल्या ५ षटकारांचा समावेश होता.

5 / 6

IPL च्या इतिहासात एका सामन्यात ३ किंवा त्यापेक्षा कमी षटकात ६० पेक्षा अधिक धावा खर्च करणारा अंशुल कंबोज हा दुसरा गोलंदाज ठरला.

6 / 6

या आधी गत हंगामात चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यातील खलील अहमदने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध एकही विकट न घेता ६५ धावा खर्च केल्या होत्या.

टॅग्स :आयपीएल २०२६चेन्नई सुपर किंग्सलखनौ सुपर जायंट्स