CSK चा डबल धमाका! रणनिती बदलून अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर ओतला पाण्यासारखा पैसा

इथं पाहा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागड्या अनकॅप्ड खेळाडूंची यादी

आयपीएल २०२६ साठी अबू धाबीत पार पडलेल्या मिनी लिलावात CSK च्या संघाने अनकॅप्ड खेळाडूंवर मोठा डाव खेळल्याचे पाहायला मिळाले. अनुभवी खेळाडूंवर भर देणाऱ्या CSK नं यावेळी रणनिती बदलून युवा खेळाडूंवर पाण्यासारखा पैसा ओतल्याचे पाहायला मिळाले.

CSK नं दोन खेळाडूंवर खेळलेली चाल ही आयपीएलच्या इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित करणारी ठरली. एकाच लिलावात त्यांनी दोन खेळाडूंवर विक्रमी बोली लावली.

यूपीच्या फिरकी अष्टपैलू प्रशांत वीरला संघात घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने १४ कोटी २० लाख रुपये मोजले. तो आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला.

त्याच्यापाठोपाठ विकेट किपर बॅटरच्या गटात असलेल्या राजस्थानच्या कार्तिक शर्मासाठीही चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने १४ कोटी २० लाख रुपये मोजले.

२०२२ च्या लिलावात लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाने आवेश खानसाठी १० कोटी मोजले होते. प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मानं हा विक्रम मोडीत काढला आहे.

२०२१ च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने कृष्णाप्पा गौथमसाठी ९ कोटी २५ लाख एवढी रक्कम मोजली होती.

२०२२ च्या लिलावात प्रिती झिंटाच्या पंजाबच्या संघाने तमिळनाडूचा क्रिकेटर शाहरुख खानसाठी ९ कोटी रुपये मोजल्याचा रेकॉर्ड आहे.

२०२२ च्या हंगामात राहुल तेवतियाला अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात गुजरात टायटन्सच्या संघाने ९ कोटी रुपयांची बोली लावली होती.

या यादीत क्रुणाल पांड्याचाही समावेश आहे. टीम इंडियात एन्ट्री मारण्याआधी २०१८ च्या लिलावात मुंबई इंडियन्सच्या संघाने त्याच्यावर ८ कोटी ८० लाख रुपये खर्च केले होते.

अबू धाबीतील २०२५ च्या लिलावात औकिब नबी दार याच्यासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने ८ कोटी ४० लाख रुपये खर्च केल्याचे पाहायला मिळाले.

पंजाब किंग्जच्या संघाने २०२९ च्या लिलावात अनकॅप्ड मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीवर ८ कोटी ४० लाख रुपयांचा डाव खेळला होता.