अर्जुन तेंडुलकरची खास पोस्ट अन् चर्चा रंगली 'त्या' दोघींच्या कमेंटची

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आयपीएलच्या नव्या हंगामात नव्या संघाकडून मैदानात उतरणार आहे.

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आयपीएलच्या नव्या हंगामात नव्या संघाकडून मैदानात उतरणार आहे.

अर्जुन तेंडुलकरनं नव्या संघासोबतचा प्रवास सुरु करण्याआधी भावूक पोस्ट शेअर करत MI फ्रँचायझी संघाने दिलेल्या संधीबद्दल आभार व्यक्त केल आहेत.

रिटेन रिलीजच्या खेळाआधी ट्रेड विंडोच्या माध्यमातून अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्समधून लखनौच्या संघात सामील झाला आहे. ३० लाख या मूळ प्राइजसह तो पहिल्यांदाच MI शिवाय अन्य फ्रँचायझीकडून खेळताना दिसेल.

अर्जुन तेंडुलकरनं नव्या संघासोबतचा प्रवास सुरु करण्याआधी भावूक पोस्ट शेअर करत MI फ्रँचायझी संघाने दिलेल्या संधीबद्दल आभार व्यक्त केल आहेत.

अर्जुन तेंडुलकरनं शेअर केलेल्या पोस्ट चांगलीच व्हायरल झाली असून यावर त्याची बहिण सारा तेंडुलकर आणि इंग्लंड महिला संघाची बॅटर डॅनियेल निकोल वेट या दोघींची कमेंट लक्षवेधी ठरताना पाहायला मिळाले.

मुंबई इंडियन्ससोबतचा प्रवास अविस्मरणीय राहिल. या संघाचा भाग होण अभिमानास्पद होते, अशा आशयाच्या शब्दांत अर्जुननं IPL मध्ये पहिली संधी देणाऱ्या संघाचे आभार व्यक्त करत नव्या संघाकडून खेळण्यास उत्सुक असल्याची भावना खास पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

अर्जुन तेंडुलकरची या पोस्टला सारा तेंडुलकरच्या कमेंटनं चार चाँद लावले. तुला कुणाची नजर ना लागो, असे म्हणत सारानं केलेली ‘love uuuu’ वाली कमेंट लक्षवेधी ठरली.

इंग्लंडची महिला क्रिकेटर डॅनियेल वेट हिने टाळ्या वाजवतानाचा इमोजीसह अर्जुन तेंडुलकरला नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तिची ही कमेंटही चर्चेचा विषय ठरतीये.