IPL 2025: राहुल द्रविड बरोबर दिसणारी 'ही' तरूणी कोण? राजस्थान रॉयल्सशी कनेक्शन काय?

Rajasthan Royals Mystery Girl connection, IPL 2025: राजस्थान रॉयल्सच्या सामन्यांच्या वेळी 'ही' तिथे बसलेली दिसते

आयपीएलच्या नव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. गतविजेत्या कोलकाता संघाने बुधवारी राजस्थान रॉयल्स विरूद्ध आपले विजयाचे खाते उघडले.

पहिल्या तीन सामन्यात संजू सॅमसनच्या जागी रियान पराग कर्णधार असलेल्या राजस्थान संघाला सलामीच्या दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.

हेड कोच राहुल द्रविड यावर नक्कीच मार्ग शोधून काढेल. पण सध्या एका फोटोत द्रविड बरोबर असलेल्या तरूणीची चर्चा रंगली आहे. 'ती' कोण?

या तरुणीचं नाव आहे कृष्मी छेडा पवार. कृष्मीने आनंद पवार यांच्याशी लग्न केलं असून तिला एक मुलगीही आहे. सध्या कृष्मी RR संघासोबत काम करतेय.

कृष्मी ही विज्ञान आणि क्रीडा अशा दोन क्षेत्रांची एकमेकांशी उत्तम सांगड घालून काम करते. ती न्यूट्रीशनिस्ट आणि स्पोर्ट्स सायंटिस्ट एक्सपर्ट आहे.

सध्या ती राजस्थान रॉयल्स या संघासोबत IPL 2025 मध्ये कार्यरत आहे. ती राजस्थान संघाची ऑफिशियल न्यूट्रिशनिस्ट म्हणून काम पाहत आहे.

कृष्मीचे क्रीडाक्षेत्राशी जुने नाते आहे. कृष्मी ही आंतरराष्ट्रीय दर्जाची माजी टेनिसपटू आहे. तिचे पती आनंद पवार हे माजी बॅडमिंटपटू आणि कोच आहेत.

कृष्मी राजस्थान रॉयल्स संघाची एक महत्त्वपूर्ण सदस्य आहे. तिने नेमून दिलेल्या डाएटमुळेच राजस्थान संघातील खेळाडू तंदुरूस्त आणि उर्जावान राहतात.