दिल्लीविरूद्धच्या सामन्यात चेन्नई संघाचा पराभव झाला. या सामन्यात दिल्लीला चिअर करायला आलेल्या एका तरुणीची चर्चा रंगली.
दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजीच्या वेळी अनेकदा तिच्यावर कॅमेरा मारण्यात आला. सामना संपल्यानंतरही पुन्हा तिची झलक दिसली.
IPL आणि ग्लॅमर हे समीकरण चाहत्यांसाठी नवीन नाही. त्यामुळे सोशल मीडियावर या सौंदर्यवतीची चर्चा रंगलेली पाहायला मिळाली.
या हॉट अँड फिट तरुणीचं नाव आहे येशा सागर (Yesha Sagar). सध्या तिच्या सौंदर्यामुळे ती क्रिकेटवर्तुळात प्रचंड चर्चेत आहे.
ती एक प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर आणि प्रेझेंटर आहे. तिचा जन्म १४ सप्टेंबर १९९५ रोजी पंजाबमध्ये झाला. सध्या ती कॅनाडामध्ये राहते.
पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर येशाने भारताबाहेर जाण्याचा निर्णय घेतला आणि २०१५ मध्ये ती कॅनडातील टोरंटो येथे राहायला लागली.
येशाने ग्लोबल कॅनडा टी२० लीग, BPL अशा क्रिकेट स्पर्धांमध्ये स्पोर्ट्स अँकरिंग केले आहे. त्यापूर्वी ती कॅनडामध्ये मॉडेलिंग करत होती.
येशा अभिनेत्री म्हणूनही काम करत होती. तसेच ती सोशल प्लॅटफॉर्मवरही खूप सक्रिय आहे. तिचे इंस्टाग्रामवर एक मिलियन फॉलोअर्स आहेत.
येशाने लोकप्रिय पंजाबी कलाकार परमिश वर्मा, अर्श बेनिपाल, गिप्पी ग्रेवाल, प्रेम ढिल्लन यासारख्या कलाकारांसोबत अनेक म्युझिक व्हिडिओ केले आहेत.
IPLच्या रविवारच्या सामन्यात दिल्लीला चिअर करताना येशाची झलक चाहत्यांनी पाहिली. ती देखील आपल्या सौंदर्यामुळे व्हायरल होत इंटरनेट सेन्सेशन बनली.