IPL 2025: MS Dhoni च्या विकेटनंतर राग व्यक्त करणारी 'ती' CSK ची मिस्ट्री गर्ल सापडली! जाणून घ्या कोण?

Who is CSK Fan Girl viral video MS Dhoni IPL 2025: धोनी बाद होताच या तरुणीचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता

राजस्थान रॉयल्स विरूद्ध रविवारच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात एका मिस्ट्री गर्लची खूपच चर्चा रंगली.

१८२ धावांचा पाठलाग करताना महेंद्रसिंग धोनी बाद झाला. मोक्याच्या क्षणी त्याचा झेल पकडला गेल्यानंतर त्या तरुणीच्या रिअँक्शनचा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला.

धोनी CSK ला सामना जिंकवून देऊ शकतो असा तिला ठाम विश्वास होता, पण धोनी बाद झाला. त्याचा तिला प्रचंड राग आला पण तिने रागाला आवर घातला असा तो व्हिडीओ होता.

हा तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. सोशल मीडियावर या तरुणीबाबत प्रचंड चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळाले. जाणून घेऊया ती तरुणी नेमकी कोण?

CSK च्या सामन्यात व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील तरुणीचे नाव आर्यप्रिया भुयान (Aaryapriya Bhuyan) असे असल्याचे सांगितले जात आहे.

आर्यप्रिया भुयान ही अवघ्या १९ वर्षांची तरुणी आहे. ती मूळची गुवाहाटीची आहे. एका व्हिडीओमुळे रातोरात ती इंटरनेट सेन्सेशन बनली असल्याचे दिसत आहे.

तिच्या व्हायरल व्हिडीओबाबत तिने एचटीशी बोलताना सांगितले, "मला कल्पनाही नव्हती मी टीव्हीवर दिसत आहे. मला धोनी बाद झाल्याचा धक्का बसला होता."

"मी इन्स्टाग्रामवर थोडेच फोटो पोस्ट करते. त्यामुळे माझे १००० हून कमी फॉलोअर्स होते, पण त्या व्हायरल व्हिडीओनंतर त्यात वाढ झाली," असे ती म्हणाली.

एका वृत्तानुसार, सामन्याआधी आर्यप्रियाचे केवळ ८०० फॉलोअर्स होते. पण व्हायरल व्हिडीओनंतर तिचे 157K पेक्षाही जास्त फॉलोअर्स झाले आहेत आणि झपाट्याने वाढत आहेत.

"१० वर्षांची असल्यापासून मी CSKची फॅन आहे. सध्या टीममध्ये काही बदल गरजेचे आहेत, त्यानंतर टीम नक्कीच कमबॅक करेल" असा विश्वास तिने व्यक्त केला.