IPL Playoffs Record : गत पाच हंगामात सर्वाधिक वेळा प्लेऑफ्स गाठणारे संघ; RCB नं 'चौकार' मारला, पण...

जाणून घ्या कोणत्या संघाची कशी राहिलीये कामगिरी यासंदर्भातील खास रेकॉर्ड

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात कोणते चार संघ प्लेऑफ्सचं तिकीट बूक करणार याची चर्चा रंगताना दिसत आहे. इथं एक नजर टाकुयात मागील पाच हंगामात सर्वाधिक वेळा प्लेऑफ्समध्ये दिलेल्या ५ संघांवर...

२०२० ते २०२४ या काळात ९ वेगवेगळ्या संघांनी प्लेऑफ्स गाठल्याचे पाहायला मिळाले आहे. यात ८ संघ प्रत्येकी २-२ वेळा प्लेऑफ्समध्ये दिसले आहेत. याशिवाय एक संघ असा आहे जो तब्बल ४ हंगामात प्लेऑफ्समध्ये खेळताना पाहायला मिळाले आहे.

५ वेळा चॅम्पियन ठरलेला मुंबई इंडियन्सचा संघ मागील पाच हंगामात दोन वेळा प्लेऑफ्समध्ये पोहचला आहे. २०२० मध्ये त्यांनी अखेरची ट्रॉफी जिंकली होती.

चेन्नई सुपर किंग्जच्या संघ २००८ ते २०१९ (दोन वर्षांची बंदी वगळता ) १० वेळा प्लेऑफ्ससाठी पात्र ठरला. पण २०२० नंतर या संघाने फक्त दोन वेळा प्लेऑफ्स गाठली. विशेष म्हणजे २०२१ आणि २०२३ च्या हंगामात प्लेऑफ्स गाठल्यावर त्यांनी जेतेपदही आपल्या नावे केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी CSK हा प्लेऑफ्समधून आउट होणारा पहिला संघ ठरला.

राजस्थान रॉयल्सचा संघही २०२२ आणि २०२४ मध्ये प्लेऑफ्समध्ये पोहचला होता. पण यंदाच्या हंगामात ते या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

२०२२ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या गुजरात टायटन्स आणि लखनौच्या संघाने प्रत्येकी २-२ वेळा प्लेऑफ्स गाठली आहे. यात गुजरातच्या संघाने पदार्पणाच्या हंगामातच जेतेपद पटकावल्याचा रेकॉर्ड आहे.

गत हंगामात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या सनरायझर्स हैदराबादनेही मागील पाच हंगामात दोन वेळा प्लेऑफ्स गाठलीये. यंदाच्या हंगामात ते इथपर्यंत पोहचणं जवळपास मुश्किलच आहे.

गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने मागील पाच वर्षात दोन वेळा प्लॅऑफ्स गाठल्याचे पाहायला मिळाले आहे.

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने २०२१ आणि २०२२ च्या हंगामात प्लेऑफ्समध्ये एन्ट्री मारली होती.

आयपीएलमध्ये एकही ट्रॉफी न जिंकणाऱ्या RCB चा संघ मागील पाच हंगामात चार वेळा प्लेऑफ्समध्ये खेळताना दिसलाय. यंदाही ते या शर्यतीत अगदी भक्कम स्थितीत आहेत. पण हा संघ अजूनही पहिल्या ट्रॉफीच्या प्रतिक्षेत आहे.