रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जाएंट्स विरुद्धच्या सामन्यात पॅट कमिन्सच्या सनरायझर्स हैदराबाद संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाजाने आपल्या बॅटिंगमधील खास अंदाज दाखवून देत आयपीएलमध्ये खास विक्रमाची नोंद केली.
सनरायझर्स हैदराबाद संघाच्या डावातील १७ व्या षटकात मैदानात उतरल्यावर पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर त्याने षटकार मारला. पुढच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर स्ट्राइकवर आल्यावरही त्याच्या भात्यातून षटकार आला.
सलग तीन षटकारासह SRH कर्णधार पॅट कमिन्स याने खास विक्रमाला गवसणी घालत धोनीच्या क्लबमध्ये एन्ट्री मारलीये.
आयपीएल स्पर्धेत मैदानात उतरल्यावर तीन चेंडूत तीन षटकार मारणारा तो चौथा फलंदाज ठरलाय. एक नजर अशी कामगिरी करणाऱ्या अन्य फलंदाजांवर
महेंद्रसिंह धोनीनं २०२४ च्या हंगामात मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात अखेरचे चार चेंडू शिल्लक असताना मैदानात उतरल्यावर सलग तीन षटकार मारले होते.
सध्याच्या घडीचा षटकार किंग निकोलस पूरन याने LSG संघाकडून खेळताना २०२३ च्या हंगामात हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरल्यावर सलग तीन षटकार मारले होते.
कोलकाता नाईट रायडर्सकडून सुनील नरेन याने २०२१ च्या हंगामात शारजाहच्या मैदानात रंगलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यावर सलग तीन षटकार मारले होते.