Join us

IPL 2025 : मेगा लिलावात या ५ खेळाडूंवर असतील RCB च्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 18:28 IST

Open in App
1 / 5

लोकेश राहुल हा गत हंगामात LSG संघाचे नेतृत्व करताना दिसला होता. तो पुढच्या हंगामात RCB कडून खेळेल अशी चर्चा आहे. जर लखनऊने त्याला रिलेज केले तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु त्याला आपल्या ताफ्यात सामील करण्यात उत्साही असेल. तो आधी या संघाकडून खेळला देखील आहे.

2 / 5

ट्रॅविस हेड याने सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यातून तुफान फटकेबाजी केली होती. आरसीबीच्या संघाने ड्युप्लेसिसला रिलीज केले तर ओपनरच्या रुपात त्यांच्या नजरा या ऑस्ट्रेलियन बॅटरवर असतील. हैदराबादच्या संघालाही त्याला नाईलाजास्तव रिलीज करावे लागू शकते. त्याचा फायदा RCB उचलणार का? ते येणारा काळच ठरवेल.

3 / 5

दुनिथ वेल्लालागे याने आपल्या फिरकीच्या जादून अनेकांना प्रभावित केले आहे. तो बॅटिंगमध्येही उपयुक्त ठरतो. त्यामुळेच RCB च्या या खेळाडूवरही नजरा असतील.

4 / 5

मिचेल स्टार्कसाठी केकेआरने मोठी रक्कम मोजली होती. पण आगामी मेगा लिलावाआधी केकेआरला या खेळाडूला रिलीज करावे लागू शकते. तो लिलावात आला तर RCB त्याच्याव डाव खेळायला कमी पडणार नाही.

5 / 5

फिल सॉल्ट हा देखील RCB च्या नजरेत असेल. कारण तोही डावाला जबरदस्त सुरुवात करून देऊ शकतो. दिनेश कार्तिकनंतर संघाला विकेट किपरचीही गरज आहे. ती कमी सॉल्टमुळे सहज भरून निघेल.

टॅग्स :आयपीएल २०२४रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरलोकेश राहुल