KKR च्या ताफ्यातील वैभवच्या टॅटूवर नजर पडली; परदेशी महिला क्रिकेटर लगेच मनातली गोष्ट बोलली

तिची नजर पडली अन् तो टॅटू प्रेमात बुडाल्याची चर्चा रंगली

आयपीएलमध्ये कोलकाताच्या ताफ्यातून खेळणाफ्या भारतीय क्रिकेटरच्या एका फोटोवर केलेल्या कमेंटमुळे ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूने सर्वांचे लक्षवेधून घेतले आहे.

मॉडर्न क्रिकेटर्समध्ये मग ती महिला असो वा पुरुष दोघांच्या स्टायलिश अंदाजात कॉमन फॅक्टर दिसतो तो टॅटू, ही परदेशी महिला क्रिकेटरही टॅटू प्रेमी आहे.

फिल्डवर विकेट घेतानाचे सेलिब्रेशन असो किंवा फिल्डबाहेरील नखरेल अंदाज टॅटू ती टॅटू फ्लॉंट करायला अजिबात विसरत नाही.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं टॅटू प्रेम दाखवून देणाऱ्या या महिला क्रिकेटरनं केकेआरच्या ताफ्यातील वैभवच्या टॅटवर केलेली कमेंट सध्या लक्षवेधी ठरतीये.

आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातून खेळणाऱ्या वैभवच्या हातावरही सेम टू सेम माझ्या काढल्याचे दिसते, अशी ट्विट तिने अधिकृत एक्स अकाउंटवरुन केलंय. केकेआरच्या फ्रँचायझी संघानंही सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांच्या टॅटू प्रेमाची सेम टू सेम गोष्ट शेअर केली आहे.

आयपीएल स्टार आणि भारताचा क्रिकेटर वैभव आरोराच्या हातावर टॅटूची जी डिझाईन दिसतीये सेम टू सेम तसाच टॅटू ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर अमांडा-जेड वेलिंग्टन हिच्या हातावरही आहे. वैभवचा टॅटू बघून तिने लगेच आपल्या मनातील गोष्ट बोलून दाखवण्यासाठी खास ट्विटच्या माध्यमातून पोस्ट शेअर केली अन् ही गोष्ट चर्चेतही आलीये.

वैभव अरोरा हा स्टायलिश क्रिकेटर आहे. पण आधी त्याचे हे टॅटू प्रेम दिसले नव्हते. नुकतात तो नव्या जमान्यातील स्टाइल स्टेंटमेंटचा टॉप ट्रेंड असलेल्या टॅटू प्रेमात बुडाल्याचे दिसते. ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूच्या कमेंटमुळे टॅटू क्लबमधील क्रिकेटमध्ये सामील झाल्याचीही चर्चा रंगू लागलीये.