Join us  

IPL 2024 RR vs MI: राजस्थानला पराभूत करणं मुंबईसाठी गरजेचंच; अशीही 'प्लेऑफ'ची शर्यत!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 2:38 PM

Open in App
1 / 7

आयपीएलच्या सतराव्या हंगामातील ३८वा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज होत आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबईसाठी आजचा साममा अत्यंत महत्त्वाचा आहे. राजस्थानने घरच्या मैदानावर मुंबईला पराभूत केले होते, त्यामुळे हार्दिकसेना पराभवाचा वचपा काढणार का हे पाहण्याजोगे असेल.

2 / 7

मुंबईने आतापैकी सात सामने खेळले असून तीन विजय आणि चार सामन्यात संघाला पराभव पत्करावा लागला आहे. रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढून हार्दिक पांड्यावर ही जबाबदारी सोपवल्यामुळे मुंबईचे सामने चांगलेच गाजत आहेत.

3 / 7

मुंबईला त्यांच्या उरलेल्या सात सामन्यांपैकी पाच सामने जिंकण्याची गरज आहे. मुंबईने पाच सामने जिंकल्यास प्लेऑफचे तिकीट मिळेल. आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव करून दोन गुण मिळवण्यावर मुंबईचे लक्ष असेल.

4 / 7

पण, राजस्थानविरूद्धचा सामना गमावल्यास मुंबईला उरलेल्या सहापैकी पाच सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे.

5 / 7

राजस्थानला नमवल्यास आठ गुणांसह मुंबई गुणतालिकेत चौथ्या स्थानाकडे कूच करेल. मुंबईला आगामी काळात त्यांच्या घरच्या मैदानावर तीन सामने खेळायचे आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हार्दिकचा संघ केकेआर, लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबादविरूद्ध खेळेल.

6 / 7

त्यामुळे आज मुंबईने विजय संपादन केल्यास काहीसा दबाव कमी होईल. मुंबई आताच्या घडीला सात गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे.

7 / 7

टॅग्स :मुंबई इंडियन्सहार्दिक पांड्याराजस्थान रॉयल्सआयपीएल २०२४