विराटने ६७ चेंडूंत शतक झळकावले आणि हे आयपीएलमधील संथ शतक ठरले. २००९ मध्ये मनिष पांडेने दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध ६७ चेंडूंत शतक झळकावले होते.
विराटने या संथ शतकाशी आज बरोबरी केली. विराट ७२ चेंडूंत १२ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ११३ धावा केल्या आणि RCB च्या ३ बाद १८३ धावाच झाल्या.
प्रत्युत्तरात RR ला दुसऱ्या चेंडूवर रिसे टॉप्लीने माघारी पाठवले. यशस्वी जैस्वालने ( ०) टोलवलेला उत्तुंग चेंडू ग्लेन मॅक्सवेलच्या हातात सहज विसावला. कर्णधार संजू सॅमसन व जॉस बटलर यांनी RR चा डाव सावरताना ६ षटकांत ५४ धावा फलकावर चढवल्या.
दरम्यान, या सामन्यात उपस्थित असलेल्या एका मिस्ट्री गर्लची चर्चा रंगली आहे. आंचल अग्रवाल असे तिचे नाव आहे.
आंचल स्टँडअप कॉमेडियन आहे आणि ती कंटेन्ट क्रिएटर आहे. ती इंदूरची आहे आणि २०१५ मध्ये ती मुंबईत राहायला गेली.