तिलक वर्माने मोडला सुरेश रैनाचा विक्रम; नेहालसह MS Dhoniलाही मागे टाकले, ६ विक्रम नोंदवले

IPL 2024 , Rajasthan Royals vs Mumbai Indians Live Marathi : आयपीएल २०२४ मध्ये खेळण्याची पहिलीच संधी मिळालेल्या नेहाल वढेराने मुंबई इंडियन्सची पडझड थांबवली. तिलक वर्मा व नेहाल या युवा डावखुऱ्या फलंदाजांनी पाचव्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी करताना MI ला ९ बाद १७९ धावांवर पोहोचवले. राजस्थानच्या संदीप शर्माने जबरदस्त पुनरागमन करताना पाच विकेट्स घेतल्या.

ट्रेंट बोल्टने पहिल्या षटकाच्या रोहित शर्माला ( ६) माघारी पाठवले. इशान किशन ( ०) आणि सूर्यकुमार यादव ( १०) यांना संदीप शर्माने बाद केले. मोहम्मद नबीला ( २३) कॉट अँड बोल्ड करून युझवेंद्र चहलने इतिहास घडवला. आणि आयपीएल इतिहासात २०० विकेट्स घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला.

तिलक वर्मा व नेहाल यांनी ५२ चेंडूंत ९९ धावा जोडल्या. नेहाल २४ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ४९ धावांवर बाद झाला. तिलकने ४५ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ६५ धावा केल्या.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून पाचव्या विकेटसाठी तिलक व नेहाल यांची ९९ धावांची भागीदारी ही तिसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. इशान किशन व किरॉन पोलार्ड ( ११९ धावा वि. RCB, २०२०) आणि रोहित शर्मा व अँड्य्रू सायमंड ( १०२* वि. DEC, २०११) ही जोडी आघाडीवर आहे. आज त्यांनी रोहित व पोलार्ड यांचा ९७ धावांचा ( वि. RCB, २०१४) यांचा विक्रम मोडला

तिलक वर्मा व नेहाल वढेरा यांनी ५२ चेंडूंत ९९ धावा जोडल्या आणि राजस्थान रॉयल्सविरुद्धची ही पाचव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. २०१९ मध्ये महेंद्रसिंग धोनी व अंबाती रायुडू यांनी ९५ धावा जोडल्या होत्या. त्याआधी २०१५ मध्ये धोनी व ड्वेन ब्राव्हो यांनी ९२ धावा जोडलेल्या.

आयपीएलमध्ये सर्वात जलद १००० धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये तिलक वर्माने आज दुसरे स्थान पटकावले. त्याने ३३ इनिंग्जमध्ये हा पल्ला गाठून सुरेश रैना व यशस्वी जैस्वाल ( ३४ इनिंग्ज) यांचा विक्रम मोडला. या विक्रमात सचिन तेंडुलकर व ऋतुराज गायकवाड ( ३१ इनिंग्ज) हे अव्वल स्थानी आहेत.

संदीप शर्माने २०व्या षटकात तीन विकेट्स घेताना डावात १८ धावांत ५ विकेट्स पूर्ण केल्या. आयपीएलमधील ही संदीपची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. त्याने २०१७ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २० धावांत ४ विकेट्स घेतल्या होत्या.