Join us  

RCB च्या प्ले ऑफच्या आशा संपल्यात जमा? जाणून घ्या IPL 2024 Point Table ची सद्यस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 11:57 PM

Open in App
1 / 5

RCB च्या फलंदाजांनीही चांगला जोर लावला होता. रजत पाटीदार, फॅफ ड्यू प्लेसिस व दिनेश कार्तिक यांच्या अर्धशतकांनी बंगळुरूला ८ बाद १९६ धावांचा डोंगर उभा करून दिला. ड्यू प्लेसिस ( ६१) व रजत ( ५०) यांनी ८२ धावा जोडून संघाचा डाव सारवला. ३८ वर्षीय दिनेश कार्तिकने २३ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ५३ धावा चोपल्या. पण, मुंबईचा जसप्रीत बुमराहने अप्रतिम मारा करून २१ धावांत ५ विकेट्स घेतल्या. तिथे बंगळुरूच्या धावा आटल्या.

2 / 5

इशान किशनने ४ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह ६९ धावा चोपल्या. २४ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ३८ धावा केल्या. सूर्यकुमार यादव १९ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ५२ धावांवर बाद झाला. मुंबईने १५.३ षटकांत ३ बाद १९९ धावा करून मॅच जिंकली. हार्दिकने ६ चेंडूंत नाबाद २१ धावा चोपल्या, तर तिलक वर्मा १६ धावांवर नाबाद राहिला.

3 / 5

Point Table वर लक्ष टाकल्यास एकच संघ ज्यांच्या खात्यात ८ गुण आहेत, ५ संघाचे प्रत्येकी ६ गुण, २ संघाचे ४ व २ संघांचे प्रत्येकी २ गुण आहेत. मुंबई इंडियन्सने ५ मध्ये २, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ६ मध्ये १ सामना जिंकला आहे. त्यामुळे RCB चा पुढील मार्ग खडतर झाला आहे.

4 / 5

राजस्थान रॉयल्सला गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला असला तरी ते ५ सामन्यांत ८ गुणांसह टेबल टॉपर आहेत. KKR व LSG यांनी ४पैकी ३ सामने जिंकून अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान टिकवले आहे. CSK ( ५ सामने ) , SRH ( ५) व GT ( ६) यांनीही ३ विजयासह खात्यात ६ गुण जमा केले आहेत, परंतु त्यांनी कोलकाता व लखनौ यांच्यापेक्षा जास्त सामने खेळले आहेत.

5 / 5

पंजाब किंग्स ५ पैकी २ सामने जिंकून ४ गुणांसह आठव्या क्रमांकावर सरकला आहे. आजच्या विजयाने मुंबई इंडियन्सने नेट रन रेट सुधारून ४ गुणांसह सातवे स्थान पटकावले आहे. RCB व DC हे प्रत्येकी २ गुणांसह अनुक्रमे ९व्या व दहाव्या क्रमांकावर आहे. RCB ला आता उर्वरीत ८ सामन्यांत किमान ६ ते ७ सामने जिंकावे लागतील, तरच ते प्ले ऑफसाठी पात्र ठरतील.

टॅग्स :आयपीएल २०२४रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमुंबई इंडियन्स