PBKSच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला. हरप्रीत ब्रार ( २-१७) व राहुल चहर ( २-१६) यांनी फिरकीवर CSK ला जाळ्यात ओढले. ऋतुराज गायकवाडने खिंड लढवली आणि ४८ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ६२ धावांची खेळी केली. अजिंक्य रहाणे ( २९), समीर रिझवी ( २१), मोईन अली ( १५) व महेंद्रसिंग धोनी ( १४) यांच्या हातभारामुळे चेन्नईने ७ बाद १६२ धावा केल्या.
CSK समोरील अडचणी कमी होताना नाही दिसल्या आणि पहिल्याच षटकात दोन चेंडू टाकून दीपक चहर दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला. रिचर्ड ग्लीसनने त्याच्या दुसऱ्या षटकात प्रभसिमरन सिंगची ( १३) विकेट मिळवली. पण, रायली रुसो ( ४३) आणि जॉनी बेअरस्टो ( ४६) यांनी मॅच फिरवली. शशांक सिंग ( नाबाद २५ ) व सॅम कुरन ( नाबाद २६) यांनी पंजाबचा विजय सहज पक्का केला. पंजाबने १७.५ षटकांत ३ बाद १६३ धावा केल्या.
या सामन्यात कॅमेरामन सतत एका तरुणीकडे कॅमेरा वळवत होता आणि तिची प्रत्येक एक्स्प्रेशन पाहण्यासारखे होते. चेन्नईच्या पराभवानंतर ती तरुणी हिरमुसली अन् सोशल मीडियावर व्हायरल झाली.
धर्शना श्रीपाल गोलेचा असे या तरुणीचे नाव आहे आणि ती मॉडेल व अभिनेत्री आहे. तिने सन टीव्हीवरील चिठी टू वरील तमिळ मालिकेद्वारे तिच्या अभिनयाची सुरुवात केली.
स्टार विजय वरील थामिझुम सरस्वथियममध्ये तिने एकत्रितपणे अभिनय केला. ती सध्या सिथतारासोबत सन टीव्हीच्या पूवा थलाय या मालिकेत काम करत आहे.