Join us

IPL 2023: थर्ड अम्पायरचा जबरा कॉन्फिडन्स, टेकनिकची मदत न घेता दिला निर्णय, घडलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 14:18 IST

Open in App
1 / 8

आयपीएलमध्ये काल रात्री दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या सामन्यात एक अजबच घटना पाहायला मिळाली. या सामन्यात गुजरात टायटन्सच्या डेव्हिड मिलरला मैदानावरील पंचांनी बाद दिले होते. त्यानंतर मिलरने डीआरएस घेतला. त्यानंतर मिलर नाबाद ठरला.

2 / 8

आयपीएल २०२३ च्या सातव्या सामन्यात एक असं चित्र दिसलं. जेव्हा तिसऱ्या पंचांनी तंत्रज्ञानाची मदत उपलब्ध असतानाही त्याचा वापर केला नाही. हा निर्णय डेव्हिड मिलरच्या विकेटशी संबंधित होता. फिल्ड अम्पायरकडून बाद दिल्या गेल्यानंतर फलंदाजाने तिसऱ्या पंचांची मदत घेतली होती.

3 / 8

क्रिकेटमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यापासून पंच आणि तिसरे पंच कुठल्याही संशयास्पद निर्णयासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतात. तसेच टीव्ही फुटेज पाहून चुकीचे निर्णय बदलतात. तसेच खेळाडूही मैदांनी पंचांचा निर्णय मान्य नसल्यास डीआरएस घेऊन दाद मागतात.

4 / 8

आयपीएलमधील सातव्या सामन्यात तर वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. या सामन्यात डेव्हिड मिलरने मैदानी पंचांच्या निर्णयाविरोधात डीआरएस घेतल्यानंतर तिसऱ्या पंचांनी डीआरएस उपलब्ध असूनही त्याचा वापर केला नाही.

5 / 8

उल्लेखनीय बाब म्हणजे तिसऱ्या पंचांनी डेव्हिड मिलरच्या दाव्याशी सहमती दर्शवत मैदानी पंचांचा निर्णय बदलवला. अशा प्रकारे गुजरात टायटन्सच्या फलंदाजाला जीवदान मिळाले.

6 / 8

गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या लढतीत गुजरातची फलंदाजी सुरू असताना १५ व्या षटकामध्ये हा प्रकार घडला. त्यावेळी कुलदीप यादव गोलंदाजी करत होता. सामन्यात गुजरातचं पारडं जड होतं. त्याचवेळी कुलदीपचा एक चेंडू मिलरच्या पायांवर जाऊन आदळला. पंचांनी तो बाद असल्याचा निर्णय दिला.

7 / 8

मात्र हा चेंडू यष्ट्यांवर आदळला नसता असं मिलरला वाटत होतं. त्यामुळे त्याने डीआरएसची मदत घेतली. तेव्हा तिसरे पंच अनिल चौधरी यांनी बॅट आणि बॉल खूप दूर असल्याचे पाहिले. त्यामुळे त्यांनी टीव्ही डायरेक्टरकडे स्निकोमीटरची मागणी केली नाही.

8 / 8

अनिल चौधरी यांनी टीव्ही डायरेक्टरकडे थेट बॉल ट्रॅकिंग दाखवण्यास सांगितलं. बॉल विकेटवर लागत नव्हता. त्यामुळे डेव्हिड मिलरला नाबाद ठरवले. सर्वसाधारणपणे पंच निर्णय देण्यापूर्वी तंत्रज्ञानाचा वापर करतात.

टॅग्स :गुजरात टायटन्सदिल्ली कॅपिटल्सआयपीएल २०२३
Open in App