IPL 2023, Qualifier 2 GT vs MI Live : रोहितचा खराब फॉर्म, इशानचे नसणे; मुंबई इंडियन्स ५ कारणांमुळे हरले

IPL 2023, Qualifier 2 Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : गुजरात टायटन्सने क्वालिफायर २ सामन्यात मुंबई इंडियन्सवर ६२ धावांनी विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली.

गुजरात टायटन्सने क्वालिफायर २ सामन्यात मुंबई इंडियन्सवर ६२ धावांनी विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. गतविजेत्या गुजरात टायटन्सला जेतेपद कायम राखण्यासाठी २८ मे रोजी चार वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्सचा सामना करावा लागणार आहे.

शुबमन गिलचे शतक अन् साई सुदर्शनसोबतच्या त्याच्या भागीदारीने गुजरात टायटन्सला फ्रंटसिटवर बसवले. गुजरात टायटन्सने २३३ धावांचा डोंगर उभा केल्या. त्यानंतर मोहित शर्माने २.२-०-१०-५ अशी अप्रतिम स्पेल टाकून मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ १७१ धावांत माघारी पाठवला.

शुबमन गिलने ६० चेंडूंत ७ चौकार व १० षटकारांसह १२९ धावा चोपल्या. शुबमन व साई सुदर्शनसह ६४ चेंडूंत १३८ धावा जोडल्या. सुदर्शनला ४३ ( ३१ चेंडू) धावांवर रिटायर्ड आऊट व्हावे लागले. हार्दिकने १३ चेडूंत २८ धावा करताना गुजरातला ३ बाद २३३ धावांपर्यंत पोहोचवले.

शुबमन गिलला सुरुवातीला दोन जीवदान देणे मुंबई इंडियन्सला महागात पडले. टीम डेव्हिडने एक झेल टाकला, तर तिलक वर्मासाठी एक सोपा झेल चालून आला होता, परंतु त्याच्याकडून तसा प्रयत्नच झाला नाही. यामुळे रोहित शर्मा प्रचंड नाराज झालेल्या दिसल्या. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची कामगिरी आज सुमार राहिली.

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरण्यापूर्वी इशान किशनला दुखापत होणे, हा मुंबईसाठी खूप मोठा धक्का होता. ख्रिस जॉर्डनचा कोपरा लागून इशानला ही दुखापत झाली आणि तो फलंदाजीला आलाच नाही. त्यात रोहित शर्मा किमान आजतरी खेळेल असे वाटले होते, परंतु चुकीचा फटका मारून तो झेलबाद झाला.

तिलक वर्मा ( ४३) व सूर्यकुमार यादव ( ६१) यांनी मॅच आणून दिली होती. परंतु चुकीच्या फटक्यांनी घात केला. सूर्यकुमार व कॅमेरून ग्रीन ( ३०) यांनीही अर्धशतकी भागीदारी केली. हे दोघंही चुकीचे फटके मारून त्रिफळाचीत झाले. सूर्यकुमारचा सुपला शॉट पुन्हा चुकला अन् तिथेच सामना मुंबईच्या हातून गेला.

मोहित शर्माने त्याच्या २.२ षटकांत १० धावा देत ५ विकेट्स घेत मुंबईचा पूर्णपणे स्पर्धेबाहेर फेकून दिले. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना मोठी भागीदारी करता न येणे हे त्यांच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले.