लखनौ सुपर जायंट्स १५ गुणांसह या शर्यतीत आघाडीवर होता आणि कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या विजयाचे त्यांचे स्थान पक्के केले.१७ गुणांसह त्यांनी तिसरे स्थान पक्के केले आहे आणि आता चौथ्या क्रमांकासाठी मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत आहे.
कोलकाताला आज ८.५ षटकांत १७८ धावांचे लक्ष्य पार करून प्ले ऑफच्या आशा जिवंत ठेवता आल्या असत्या, परंतु त्यांना ते शक्य झाले नाही. मात्र, त्यांनी ८० + धावा करून चेन्नईला क्वालिफायर १ साठी पात्र केले.
गुजरात टायटन्सने १३ सामन्यांत १८ गुणांची कमाई करताना क्वालिफायर १ मधील आपले स्थान पक्के केले. चेन्नई सुपर किंग्स १७ गुणांसह ०.६५२ अशा नेट रन रेटसह दुसऱ्या स्थानावर आहेत आणि ते २३ मे रोजी क्वालिफायर १ मध्ये गुजरातचा सामना करतील.
आता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू त्यांचा अखेरचा साखळी सामना जिंकून प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. पण, RCB चा रन रेट ०.१८० असा आहे आणि MI चा -०.१२८ असा आहे. त्यामुळे मुंबईला उद्या SRHवर मोठा विजय मिळवाला लागेल आणि त्याचवेळी RCBचा GTकडून पराभवाची वाट पाहावी लागेल.
राजस्थान रॉयल्सचे १४ सामने झाले असले तरी तेही अजून स्पर्धेत आहेत. उद्या मुंबई व बंगळुरू या दोघांचाही पराभव झाल्यास त्यांचा नेट रन रेट कमी होईल. अशा परिस्थितीत ०.१४८ नेट रन रेट व १४ गुण असलेल्या RRलाही संधी मिळू शकते.