Join us

IPL 2023, CSK vs RR : कोण प्रार्थना करत होतं, कोणाच्या डोळ्यांत आलेले अश्रू! MS Dhoni साठी होती सर्व क्रेझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 15:44 IST

Open in App
1 / 6

IPL 2023 च्या मागील ४-५ सामन्यांत या सर्वांची अनुभवी अनेकांनी घेतली, परंतु कालचा सामना हा वेगळा होता. इथे भावनिक नाळ जोडली गेली होती आणि ती MS Dhoni सोबतची होती...

2 / 6

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी कदाचीत यानंतर आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. त्यामुळे त्याच्या प्रत्येक सामन्याला प्रेक्षक हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून 'माही'प्रती आपलं प्रेम व्यक्त करत आहे. चेपॉकवर काल झालेला सामना हा त्या प्रेमाची लाट घेऊन आला होता.

3 / 6

महेंद्रसिंग धोनीचा हा CSKचा कर्णधार म्हणून दोनशेवा सामना होता आणि त्यात त्याने विजय मिळवावा ही चाहत्यांची अपेक्षा होती. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अनेक तारका ही मॅच डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी स्टेडियमवर अवतरल्या होत्या. धोनीने चाहत्यांच्या मनात एक आपलसं स्थान बनवलं आहे आणि त्याच्या प्रेमापोटी चाहते स्टेडियमवर येत आहेत.

4 / 6

१७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १५व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर डेव्हॉन कॉनवे बाद झाला. ६ बाद ११३ अशी अवस्था असताना महेंद्रसिंग धोनी मैदानावर उतरला ३६ चेंडूंत ६३ धावा CSKला बनवायच्या होत्या. धोनी आहे तर सर्व मुनकिन आहे, हा विश्वास चाहत्यांच्या मनात पक्कं घर करून बसला आहे.

5 / 6

रवींद्र जडेजानेही धोनीला चांगली साथ दिली. १ चेंडू ५ धावा अशा परिस्थितीत धोनी स्ट्राईकवर होता अन् स्टेडियमवर स्मशान शांतता पसरली. धोनीने यापूर्वीही असा सामना काढला होता आणि आजही तो यशस्वी होईल, हा विश्वास होता. पण, संदीप शर्माने अप्रतिम यॉर्कर टाकला अन् ३ धावांनी RR जिंकला.

6 / 6

धोनीने विजयी षटकार खेचावा यासाठी एक काकू प्राथर्ना करताना दिसल्या. काही तरुणी रडकुंडीला आलेल्या आणि धोनीचा फटका चुकल्यावर त्यांना अश्रू अनावर झाले.

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनीऑफ द फिल्ड
Open in App