Join us

IPL 2023, CSK vs RR Live : MS Dhoniच्या '२००'व्या सामन्याची 'South Queen'ने शोभा वाढवली, तिला पाहताच जनता वेडीपिसी झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 21:40 IST

Open in App
1 / 6

यशस्वी जैस्वालने ( १०) पहिल्या षटकात दोन सुरेख चौकार खेचले, परंतु तुषार देशपांडेचे दुसऱ्या षटकात त्याची विकेट घेतली. आज फलंदाजीला पॉवर प्लेच्या आत खेळण्याची संधी मिळालेल्या पडिक्कलचा झेल अलीने टाकला आणि त्यानंतर RR च्या फलंदाजाने अप्रतिम खेळ केला. पडिक्कल व बटलर यांनी ४१ चेंडूंत ७७ धावांची भागीदारी केली.

2 / 6

पडिक्कल २६ चेंडूंत ५ चौकारांसह ३८ धावांवर झेलबाद झाला. रवींद्र जडेजाने पडिक्कलपाठोपाठ संजू सॅमसचा ( ०) त्रिफळा उडवला. पुढच्याच चेंडूवर अश्विनही बाद झाला असता, परंतु अलीने आणखी एक झेल सोडला. जडेजाने २१ धावांत २ विकेट्स घेतल्या.

3 / 6

पडिक्कल २६ चेंडूंत ५ चौकारांसह ३८ धावांवर झेलबाद झाला. रवींद्र जडेजाने पडिक्कलपाठोपाठ संजू सॅमसचा ( ०) त्रिफळा उडवला. पुढच्याच चेंडूवर अश्विनही बाद झाला असता, परंतु अलीने आणखी एक झेल सोडला. जडेजाने २१ धावांत २ विकेट्स घेतल्या.

4 / 6

अलीच्या चुकीच्या थ्रो मुळे अश्विन रन आऊट होता होता वाचला. दोन जीवदान मिळालेल्या अश्विनने १५व्या षटकात दोन खणखणीत षटकार खेचले. तिसऱ्यांदा चेंडू सीमापार पाठवण्याच्या प्रयत्नात अश्विन झेलबाद झाला. त्याने २२ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह ३० धावांवर बाद झाला.

5 / 6

१७व्या षटकात अलीने RRला मोठा धक्का देताना जॉस बटलरचा त्रिफळा उडवला. बटलरने ३७ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ५२ धावा केल्या. शेवटच्या षटकांत शिमरोन हेटमायरने चांगली फटकेबाजी करून CSK समोर आव्हानात्मक धावसंख्या उभ्या केल्या.

6 / 6

हेटमायरने १८ चेंडूंत २ चौकार व २ षटकार खेचून नाबाद ३० धावा केल्या. राजस्थानने ८ बाद १७५ धावा केल्या. आकाश सिंग व तुषार यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तुषारच्या गोलंदाजीवर एक सोपा झेल टाकला.

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनीऑफ द फिल्ड
Open in App