इंडियन प्रीमिअर लीग २०२२चे दोन फायनलिस्ट ठरले आहेत आणि आता रविवारी गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात जेतेपदाचा सामना होणार आहे.
जोस बटलरने ( Jos Buttler) क्वालिफायर २ सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध शतकी खेळी करून RRला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला.
बटलरच्या या खेळीनंतर सोशल मीडियावर Lara van der Dussen या तरुणीची चर्चा रंगली... तसे पाहता संपूर्ण आयपीएल २०२२ दरम्यान ती आर अश्विनच्या पत्नीसोबत स्टेडियममध्ये दिसत होती आणि तेव्हा ती बटलरची पत्नी असावी, असा अंदाज बांधला गेला होता.
त्यात तिने गमतीने म्हटले की, ‘जोस बटलरला मी दुसरा पती म्हणून स्वीकारले आहे.’बटलरच्या फटकेबाजीनंतर लॉराची नेहमीच पंचाईत होते.
लॉराने राजस्थानच्या पॉडकॉस्टवर सांगितले की, माझ्या मते मी आता बटलरला दुसरा पती म्हणून स्वीकारायला हवे. मला जोस बटलरची पत्नी लुईसच्या नावाने ओळख लाभली आहे.
पण, लारा ही जोस बटलरची नव्हे तर दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रॅसी व्हॅन डेर ड्युसेनची पत्नी आहे. लारा ही गणिताची शिक्षिका आहे.
५ जानेवारी २०१२मध्ये लारा व रॅसी यांनी लग्न केले. लाराने तिच्या सोशल अकाऊंट्सवर स्वतःबाबत फार माहिती दिलेली नाही.