Join us  

Rinku Singh story IPL 2022 : रस्त्यावर झाडू मारली, रिक्षा चालवली!; KKRच्या रिंकू सिंगने सिलेंडर डिलिव्हरी करणाऱ्या बापाची मान अभिमानाने उंचावली!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2022 3:37 PM

Open in App
1 / 9

Rinku Singh story IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल २०२२) शाहरुख खानचा संघ कोलकाता नाईट रायडर्स ( KKR)ने पाच पराभवानंतर अखेर विजयाची चव चाखली. २३ चेंडूंत ६ चौकार व २ षटकार खेचून ४२ धावा कुटणारा रिंकू सिंग ( Rinku Singh) हा KKRच्या विजयाचा नायक ठरला. कोलकाताने त्याच्या दमदार खेळीमुळे राजस्थान रॉयल्सवर ७ विकेट्स राखून विजय मिळवला आणि प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या.

2 / 9

या विजयानंतर रिंकू सिंग पुन्हा एका प्रसिद्धीत आला. फार कमी जणांना माहित्येय की रिंकूने सफाई कामगाराचं काम केलंय, ऑटो रिक्षा चालवलीय... अलिगढचा रिंकू हा गरीबीतून वर आला आहे आणि त्याचे कुटुंबीय फार साधे सरळ आहेत. त्याचे वडील दारोदारी गॅस सिलेंडरची डिलिव्हरी करतात आणि भाऊ ऑटो रिक्षा चालवतो.

3 / 9

आयुष्यात एक काळ असा आला होता की रिंकूनेही सफाई कामगारीचे काम केले होते. कुटूंबाचा आर्थिक गाढा चालवण्यासाठी त्याने भावाची रिक्षाही चालवली होती. त्याने अजूनही नववी पास केलेली नाही. एका छोट्याश्या घरात ९ सदस्यांच्या कुटुंबासह तो राहतो.

4 / 9

रिंकूला आयपीएल ऑक्शनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने ८० लाखांत आपल्या ताफ्यात घेतले आणि त्याच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली.

5 / 9

''मला वाटलेलं ऑक्शनमध्ये २० लाखच मिळतील, परंतु माझ्यासाठी ८० लाखांची बोली लागली. त्याचक्षणी पहिला विचार आला की भावाच्या लग्नासाठी काही रक्कम खर्च करू आणि उरलेली रक्कम बहिणीच्या लग्नासाठी साठवून ठेवू आणि एका चांगल्या घरात राहायला जाऊ,''अशी प्रतिक्रिया रिंकूने दिली होती.

6 / 9

तो पुढे म्हणाला होता,''माझे वडील महिन्याला ६-७ हजार रुपये कमावतात. माझे कुटूंब मोठं आहे आणि त्यामुळे मला क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रीत करून मोठा पल्ला गाठण्यापलीकडे काहीच पर्याय नव्हता. आयुष्यात खूप स्ट्रगल केले आणि कदाचीत देवाने त्याचेच फळ मला दिले.''

7 / 9

२०१५मध्ये त्याच्या कुटुंबीयांवर ५ लाखांचे कर्ज होते आणि तेव्हा १९ वर्षांखालील संघाकडून खेळताना रिंकूला जे पैसे मिळायचे ते तो साठवायचा. एक काळ असा आला की त्याने क्रिकेट सोडून सफाई कर्मचाऱ्याचं काम करण्यास सुरुवात केली. पण, त्याने पुन्हा क्रिकेट खेळण्याचा निर्धार केला.

8 / 9

२०१६-१७मध्ये त्याने उत्तर प्रदेश संघाकडून प्रथम क्षेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्या पर्वात त्याने ४९.४३च्या सरासरीने ६९२ धावा केल्या. पण, स्थानिक क्रिकेटमध्ये आपलं नाव गाजवण्यासाठी किमान १००० धावा कराव्या लागतील याची जाणीव त्याला होती.

9 / 9

२०१८-१९मध्ये त्याने १३ डावांत चार शतकं व तीन अर्धशतकांसह १०५.८८च्या सरासरीने ९५३ धावा चोपल्या. जम्मू -काश्मीर विरुद्धच्या लढतीत संघाची अवस्था ५ बाद ७९ अशी असताना रिंकू फलंदाजीला आला अन् ६६ धावांची खेळी करून गेला. त्यानंतर सौराष्ट्रविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत उत्तर प्रदेशची अवस्था ४ बाद ५४ अशी असाताना रिंकूने दमदार खेळी केली. त्याने १८१ चेंडूंत १५० धावा चोपल्या आणि संघाला ३८५ धावांचा डोंगर उभा करून दिला.

टॅग्स :आयपीएल २०२२कोलकाता नाईट रायडर्सउत्तर प्रदेशराजस्थान रॉयल्स
Open in App