Join us

IPL 2022 who is abhinav manohar: वडील चालवतात चपलांचं दुकान, IPL लिलावात तब्बल २.६० कोटींची बोली लागलेल्या खेळाडूनं ७ चेंडूत सामना पलटवला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 18:23 IST

Open in App
1 / 8

इंडियन प्रीमियर लीग ही एक अशी स्पर्धा आहे, जिथं कोणत्याही खेळाडूचं नशीब काही चेंडूतच पालटू शकतं. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यातही असंच काहीसं घडलं. लखनौविरुद्धचा सामन्यात महत्वाच्या क्षणी गुजरात टायटन्सच्या अभिनव मनोहर यानं अवघ्या ७ चेंडूत सामना फिरवला.

2 / 8

गुजरात टायटन्सला लखनौविरुद्ध अखेरच्या ३० चेंडूत ६८ धावांची गरज होती. तेव्हा डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतिया ही जोडी क्रीझवर होती आणि दोघांनी सामन्याला कलाटणी दिली. पण त्यानंतर डेव्हिड मिलरची विकेट पडली. यानंतर अभिन मनोहर क्रिजवर आला, त्यानं राहुल तेवतियासोबत सामना संपवला.

3 / 8

अभिनव मनोहरनं सात चेंडू खेळून १५ धावा केल्या. त्यानं तीन चौकार मारले, जे त्यावेळी संघाच्या विजयासाठी खूप महत्त्वाचे होते. कारण तिथं विकेट पडली असती किंवा डॉट बॉल असता तर सामना लखनौच्या बाजूनं गेला असता.

4 / 8

सामना संपल्यानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यानंही त्याचं कौतुक केलं. आगामी काळात तुम्हाला अभिनव मनोहरबद्दल खूप काही ऐकायला मिळेल. अभिनव हा हुशार खेळाडू आहे, जो आपल्या खेळानं सर्वांना प्रभावित करतो, असं हार्दिक पंड्या म्हणाला.

5 / 8

अभिनव मनोहरला मेगा ऑक्शनमध्ये गुजरात टायटन्सने २.६० कोटींच्या बोलीसह खरेदी केलं होतं. 27 वर्षीय अभिनव मूळचा कर्नाटकचा असून स्थानिक क्रिकेटमध्ये जबरदस्त खेळ दाखवून सर्वांची मनं जिंकली आहेत.

6 / 8

अभिनव मनोहरबाबत जर तुम्हाला माहिती असेल तर त्याची चुलत बहीण देखील क्रिकेट खेळते, ती जर्मनीच्या महिला क्रिकेट संघाची सदस्य आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये यावेळी अभिनव मनोहरने खूप धावा केल्या, काही मोठे खेळाडू कर्नाटकच्या संघात नव्हते, त्यामुळे अभिनवला जबरदस्त फायदा झाला.

7 / 8

अभिनव मनोहरचे वडील चपलांचं दुकान चालवायचे, तर त्याचा एक मित्र कपड्यांचं काम करायचा. दोघांच्या मैत्रीमुळे अभिनव मनोहर क्रिकेट अकादमीपर्यंत पोहोचला आणि त्याचं करिअर याच क्षेत्रात घडलं. आयपीएलमध्ये आल्यानंतर अभिनवचे नशीब पुन्हा एकदा पालटलं असून आता सर्वांच्या नजरा त्याच्याकडे लागल्या आहेत.

8 / 8

टॅग्स :आयपीएल २०२२गुजरात टायटन्सलखनौ सुपर जायंट्स
Open in App