Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2022: पंजाब किंग्सच्या प्रत्येक सामन्यात दिसते, कॅमेऱ्याचे लक्ष वेधून घेते, कोण आहे ही तरुणी, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 22:59 IST

Open in App
1 / 8

इंडियन प्रीमियर लीगमध्ये पंजाब किंग्सचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष करत आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात पंजाबचा संघ राजस्थानकडून पराभूत झाला. मात्र असं असलं तरी हा संघ नेहमीच चर्चेत असतो. तसेच पंजाब किंग्सच्या प्रत्येक सामन्यात स्टेडियममध्ये दिसणारी एक मिस्ट्री गर्लही लक्ष वेधून घेत असते.

2 / 8

पंजाब किंग्सच्या प्रत्येक सामन्यात दिसणाऱ्या या मिस्ट्री गर्लचं नाव आहे शशी धीमन. ती संघाच्या सोशल मीडिया पेजसाठी अँकरिंग करते. पंजाब किंग्सने आयपीएल २०२२च्या हंगामात अनेक युट्युब व्हिडीओ आणि इन्स्टाग्राम रिलीज केले आहेत. त्यामध्ये शशी धीमन दिसत आहे.

3 / 8

शशी धीमनने आतापर्यंत शिखर धवन, कागिसो रबाडा, लियाम लिव्हिंगस्टोन यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्याशिवाय पंजाब किंग्स टीमचे प्री आणि पोस्ट मॅच व्हिडीओसुद्धा ट्रेंडिंगमध्ये राहिले आहेत.

4 / 8

शशी धीमनबाबत बोलायचं झाल्यास ती एक स्टँडअप कॉमेडियन आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून ती स्टँडअप कॉमेडी करत आहे. तिचे अनेक व्हिडीओ खूप लोकप्रिय झाले आहेत.

5 / 8

चंदीगडमधील रहिवासी असलेली शशी धीमन ही पंजाबी आहे. त्यामुळे ती खेळाडूंसोबत पंजाबीमध्येसुद्धा बोलते. अनेक व्हिडीओ पंजाबीमध्ये शूट करते. असा परिस्थिती पंजाब किंग्सच्या फॅन्ससोबत टीमचं कनेक्शन उत्तमपणे तयार होत आहे.

6 / 8

शशी धीमन २०२०पासून मुंबईमध्ये राहत आहे. तसेच ती विविध स्टँड अप कॉमेडी शो करत आहे. २०२२ च्या आयपीएलसाठी ती पंजाब किंग्सच्या संघासोबत जोडली गेली आहे.

7 / 8

शिक्षणाचा विचार केल्यास शशी धीमन फार्मा सँटिस्ट आहे. मात्र तिने मेडिकल सायन्सच्या शिक्षणानंतर तिने स्टँडअप कॉमेडीकडे लक्ष वळवले.

8 / 8

शशी धीमन पंजाब किंग्सच्या प्रत्येक सामन्यामध्ये ती स्टेडियममध्ये असते. तसेच खेळाडूंसोबत ती बसमधून प्रवास करते. तसेच त्यांच्या मुलाखती घेते.

टॅग्स :आयपीएल २०२२पंजाब किंग्स
Open in App