Join us

IPL 2022 : MS Dhoni च्या CSK कडे दुखापतग्रस्त Deepak Chahar ला आहेत 'हे' तीन पर्याय; १४ कोटींना चहरला घेतलं होतं विकत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 18:55 IST

Open in App
1 / 6

Deepak Chahar MS Dhoni : IPL 2022 च्या मेगालिलावात चेन्नई सुपर किंग्सने (CSK) वेगवान गोलंदाज दीपक चहरला विकत घेतलं. तब्बल १४ कोटींच्या बोलीसह तो लिलावातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला.

2 / 6

दीपक चहरने लिलावाआधी झालेल्या क्रिकेट मालिकांमध्ये आपल्या अष्टपैलू खेळीची चमक दाखवली होती. त्यामुळेच त्याच्यावर जोरदार बोली लावण्यात आली.

3 / 6

दीपक चहरवर बोली लागल्यानंतर विंडिज मालिकेत तो दुखापतग्रस्त झाला. त्याची दुखापत गंभीर असून त्याला IPL च्या बऱ्याचशा सामन्यांना मुकावे लागणार असल्याची चर्चा आहे. अशा वेळी त्याच्या बदली CSK कडे पुढील तीन पर्याय उपलब्ध आहेत.

4 / 6

इशांत शर्मा (Ishant Sharma) - हा अनुभवी गोलंदाज असून दिल्ली कॅपिटल्समध्ये त्याने चांगली कामगिरी करून दाखवली आहे. दीपक चहरप्रमाणेच सुरूवातीच्या षटकांमध्ये शिस्तबद्ध गोलंदाजी करण्यात तो पटाईत असल्याने धोनीसाठी तो चांगला पर्याय आहे.

5 / 6

संदीप वारियर (Sandeep Warrier) - हा केरळकडून बरेच स्थानिक सामने खेळलेला आहे. परदेशी प्रशिक्षकांच्या गळ्यातला ताईत असलेला संदीप यंदा अनसोल्ड राहणं हा एक धक्काच मानला जात आहे. संदीप वारियरकडे ६३ टी२० सामन्यांचा अनुभव आहे.

6 / 6

अरझान नगवासवाला (Arzan Nagwaswalla) - हा तुलनेने नवखा गोलंदाज आहे. पण तो डावखुरा वेगवान गोलंदाज असल्याने त्याच्या निमित्ताने CSK ला एक वेगळा पर्याय नक्की मिळू शकतो. त्याच्याने आतापर्यंत २० टी२० सामन्यांमध्ये २० विकेट्स घेतल्या आहेत.

टॅग्स :आयपीएल २०२२महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सइशांत शर्मा
Open in App