Join us  

IPL 2022, MI Vs DC: मुंबईला पराभवाचा धक्का देणारा ललित यादव कोण आहे? दोन वेळा मारलेत ६ चेंडूत ६ षटकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 11:25 AM

Open in App
1 / 8

आयपीएलमध्ये रविवारचा दिवस हा डबल हेडर लढतींचा होता. यातील पहिल्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने एका रोमांचक लढतीत मुंबई इंडियन्सला पराभूत केले. १७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एकवेळ अडखळलेल्या दिल्लीच्या संघाने ललित यादव आणा अक्षर पटेल यांच्या तुफानी भागीदारीच्या जोरावर रोमांचक विजय मिळवला.

2 / 8

दिल्ली कॅपिटल्सच्या ललित यादवने अक्षर पटेलसोबत मिळून सामन्याचे चित्रच पालटवले. त्याने ३८ चेंडूत ४८ धाव कुटल्या. यादरम्यान त्याने चार चौकार आणि दोन षटकार ठोकले. ललित आणि अक्षर पटेलच्या भागीदारीच्या जोरावर दिल्लीने अखेरच्या ३० चेंडूत ७५ धावा कुटल्या.

3 / 8

२५ वर्षांचा ललित यादव आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळतो. तर देशांतर्गत स्पर्धांमध्येही तो दिल्लीचं प्रतिनिधित्व करतो. आयपीएल २०२२ च्या लिलावामध्ये दिल्लीने त्याला केवळ ६५ लाख रुपयांमध्ये खरेदी केले होते.

4 / 8

ललित यादव आयपीएलमध्ये आतापर्यंत केवळ ८ सामने खेळला आहे. त्यात त्याने ११६ धावा काढल्या आहेत. त्यातील मुंबई विरुद्ध काल केलेली नाबाद ४८ धावांची खेळी ही आयपीएलमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

5 / 8

ललित यादव याच्या नावे एक खास रेकॉर्डही आहे. त्याने ६ चेंडूत ६ षटकार ठोकण्याचा विक्रम दोनदा केला आहे. दिल्लीतील दोन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्याने ही कामगिरी केली होती. त्यातील एका खेळीत त्याने ४६ चेंडूत१३० धावा कुटल्या होत्या.

6 / 8

ललित यादवने २०१७ मध्ये प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यात त्याने महाराष्ट्राविरुद्ध ५२ धावांची खेळी केली होती.

7 / 8

दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलमधील आपल्या पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. तर मुंबईला पहिल्या सामन्यात पुन्हा एकदा पराभवाचा धक्का बसला आहे.

8 / 8

दिल्लीच्या या विजयात ललित यादव आणि अक्षर पटेलची भागीदार निर्णायक ठरली.

टॅग्स :आयपीएल २०२२दिल्ली कॅपिटल्समुंबई इंडियन्स
Open in App