Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL: आयपीएलमध्ये खेळाडूंना कसा आणि केव्हा मिळतो पैसा...?; जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 05:46 IST

Open in App
1 / 7

नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या लिलावात अनेक खेळाडूंनी कोटींच्या कोटी उड्डाणे घेतली. तर काहींच्या पदरी निराशा आली. पण, या सगळ्या चर्चांदरम्यान एक रास्त प्रश्न सामान्य माणसाला पडू शकतो की कोटींच्या घरात बोली लागलेल्या या खेळाडूंना त्यानंतर ही रक्कम कशी दिली जाते?

2 / 7

म्हणजे ती एकाचवेळी मिळते की टप्प्याटप्प्याने? तसेच एका वर्षासाठीची ही रक्कम आहे की तीन वर्षांचा करार मिळून? असे एक ना अनेक प्रश्न अनेकांना पडलेले असतात. त्यामुळेच सामान्यांना पडलेल्या याच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आयपीएल खेळाडूंच्या ‘सॅलरी स्ट्रक्चर’वर टाकलेला हा दृष्टिक्षेप...

3 / 7

उत्तर - ३ वर्षांसाठी. कारण सामन्यत: लिलावादरम्यान निवडलेल्या खेळाडूसोबत तीन वर्षांचा करार केला जातो. तसेच पुढच्या सीजनसाठी जर त्याला संघाने रिटेन केले तर त्याच्या करार रकमेमध्ये वाढदेखील होते. मात्र जर फ्रँचायझीनेच करार रद्द केला तर त्यांना ठरल्याप्रमाणे खेळाडूला पुर्ण रक्कम द्यावी लागते.

4 / 7

उत्तर - १ वर्षासाठी. म्हणजेच इशानला जर १५.२५ कोटींच्या बोलीवर मुंबईने संघात घेतले आहे. तर त्यांना ईशानला तीन वर्षांचे मिळून ४५.७५ कोटी रुपये द्यावे लागतील. यादरम्यान ईशान किशन मुंबईकडून किती सामने खेळेल यावर काही बंधन नाही. तो एकही सामना जरी नाही खेळला तरी मुंबईला त्याला पूर्ण पैसे द्यावे लागतील.

5 / 7

उत्तर - स्पर्धा सुरू झाल्याच्या १० दिवसांआधी २० टक्के रक्कम, स्पर्धेदरम्यान ६० टक्के रक्कम आणि स्पर्धा संपल्यानंतर उर्वरित २० टक्के रक्कम अशा स्वरूपात फ्रँचायझींना ठरलेली रक्कम खेळाडूंना द्यावी लागणार आहे. पण कधी कधी हे अवलंबून करतं की फ्रँचायझींकडे किती रक्कम शिल्लक आहे. तसेच प्रायोजकांकडून भविष्यात त्यांनी किती रक्कम मिळ‌णार आहे. आपल्या सोयीनुसारही ते खेळडूंना ठराविक मुदतीत पैसे देऊ शकतात.

6 / 7

उत्तर : हो. नियमाप्रमाणे भारतीय खेळाडूंना त्यांना मिळालेल्या रकमेवर १० टक्के तर विदेश खेळाडूंना २० टक्के रक्कम टीडीएसच्या स्वरूपात द्यावी लागते.

7 / 7

उत्तर - या परिस्थितीतही खेळाडूंनी पूर्ण रक्कम ही फ्रँचायझींना द्यावीच लागते. तसेच खेळाडूंच्या दुखापतीचा खर्चही उचलावा लागतो. पण जर स्पर्धा सुरू होण्याआधीच खेळाडू दुखापतग्रस्त झाला असेल तर त्याला कुठलीही रक्कम फ्रँचायझींकडून मिळत नाही. याव्यतिरिक्त खेळाडू जर काहीच सामन्यांसाठी उपलब्ध असेल तर त्याला प्रो-राटा नियमानुसार पैसे दिले जातात

टॅग्स :आयपीएल २०२२इशान किशन
Open in App