IPL Closing Ceremony 2022: रणवीर सिंग, एआर रहमानचा धमाका; स्टँड्समध्ये बॉलिवूडचा खिलाडी... पाहा खास फोटोज

सामना सुरू होण्याआधी रंगला धडाकेबाज सांगता सोहळा

IPL Closing Ceremony 2022: फायनलच्या सामन्याआधी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये शानदार सांगता सोहळा (Closing Ceremony) रंगला. बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंग, प्रसिद्ध गायक ए आर रहमान यांच्यासह अनेक मेगास्टार्सनी आपली कला सादर केली. पाहूया या सेरेमनीचे काही खास फोटो.

बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंगने सांगता सोहळ्याची धमाकेदार सुरूवात केली. ८३ या चित्रपटाच्या गाण्याने त्याने परफॉमन्सला सुरूवात केली. त्याने तब्बल १५ मिनिटं नॉन-स्टॉप डान्स केला आणि चाहत्यांना खूश करून टाकलं.

रणवीरनंतर प्रसिद्ध गायक ए आर रहमानने आपल्या सहकलाकारांसोबत गाणी सादर केली. त्याला साथ देण्यासाठी सुप्रसिद्ध गायक मोहित चौहान आणि गायिका निती मोहन हेदेखील स्टेजवर होते.

IPL फायनल दरम्यान बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार, प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह, IPL चेअरमन ब्रिजेश पटेल असे अनेक खास लोक उपस्थित होते.

IPL फायनलच्या निमित्ताने सर्व समालोचक आणि अँकर खास पारंपरिक पोशाखात दिसले. सुनील गावसकर, रवि शास्त्री, मॅथ्यू हेडन, गॅम स्मिथ, इरफान पठाण यांचसह सारेच पारंपरिक पोशाखात होते.

IPL Finals मध्ये एक मोठा विक्रम बनवण्यात आला. या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. BCCI ने जगातील सर्वात मोठी जर्सी (६६x४२ फूट) बनवल्याचा तो विक्रम होता.

समारोप सोहळ्याच्या वेळी भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे मोठा उत्सव साजरा करण्यात आला.

सांगता सोहळ्यामध्ये स्वातंत्र्यनंतर आतापर्यंतच्या भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम क्षणांचे स्मरण करण्यात आले.

सर्व फोटो- IPL.com , सोशल मीडिया