Join us

IPL 2021: कोरोनानं IPLचं बायो-बबल भेदलं! KKR स्पर्धेतून 'आऊट' की आयपीएल स्पर्धाच रद्द?, BCCI पेचात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 13:43 IST

Open in App
1 / 10

आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्थी आणि संदीप वॉरियर यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर इतरही काही खेळाडूंची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे.

2 / 10

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना होणार होता. पण आता कोलकाता संघातील दोन खेळाडूंनी कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे आजचा सामना रद्द करण्यात आला आहे.

3 / 10

आयपीएलमधील सर्व आठ संघ आणि सपोर्ट स्टाफसह सर्व खेळाडू बायो-बबलमध्ये होते. तरीही कोरोनाचा शिरकाव झाल्यानं आता बीसीसीआयसमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

4 / 10

कोलकाता संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली असून आणखी काही खेळाडूंची तब्येत बिघडल्याचं सांगितलं जात आहे. मग पुढील सामने कसे घ्यायचे? असा पेच बीसीसीआयसमोर निर्माम झाला आहे.

5 / 10

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघानं आजचा सामना खेळण्यास नकार दिला आहे. केकेआरचा संपूर्ण संघच जर विलगीकरणात असल्यानं आयपीएलमधून कोलकाताचा संघ आता बाहेर पडण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे उर्वरित स्पर्धा केकेआरशिवाय खेळविण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

6 / 10

आयपीएलचं यंदाचं सीझन मध्यांतरापर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळे पुढचे सामने प्रत्येक संघासाठी महत्वाचे आहेत. पण स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्यानं सामने होणार तरी कसे असा प्रश्न बीसीसीआयसमोर आहे. त्यामुळे कोणताही धोका पत्करण्याऐवजी संपूर्ण स्पर्धाच रद्द करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

7 / 10

भारताता कोरोना वाढीमुळे ऑस्ट्रेलियाच्या काही खेळाडूंनी देखील याआधीच स्पर्धेतून माघार घेतली होती. त्याशिवाय बायो-बबलमधील त्रृटींकडेही लक्ष वेधलं होतं. ऑस्ट्रेलियाचा अॅडम झम्पा, अँड्रयू टाय, केन रिचर्डसन आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी आयपीएलमधून माघार घेतली होती.

8 / 10

देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आयपीएलवर एवढा खर्च कसा काय केला जाऊ शकतो, अशी टीका देखील केली जात होती. याशिवाय काही माजी क्रिकेटपटूंनीही स्पर्धे रद्द करण्याची भूमिका घेतली होती. पण बीसीसीआयनं स्पर्धा सुरूच राहणार असल्याची ठाम भूमिका जाहीर केली होती.

9 / 10

कोरोनानं आज आयपीएलमधील एका संघात शिरकाव केला आहे. उद्या कोरोनानं आणखी भयंकर रुप धारण करत खेळाडूंना विळखा घातला तर काय करणार? अशा अडचणी आता बीसीसीआयसमोर निर्माण झाल्या आहेत.

10 / 10

दरम्यान, केकेआरमध्ये दोन खेळाडू वगळता इतर सर्व खेळाडूंची कोरोनाची चाचणी निगेटीव्ह आल्याची माहिती बीसीसीआयनं दिली आहे. आजचा सामना रद्द करण्यात आल्याची घोषणा बीसीसीआयनं केली आहे. आता बीसीसीआयच्या पुढच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

टॅग्स :आयपीएल २०२१कोलकाता नाईट रायडर्सबीसीसीआय