राजस्थान रॉयल्सच्या ५ बाद १६४ धावांचा सनरायझर्स हैदराबादनं १८.३ षटकांत ३ बाद १६७ धावा करून यशस्वी पाठलाग केला. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसननं ५७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ८२ धावा केल्या, तर यशस्वी जैस्वाल ( ३६) व महिपाल लोम्रोर ( २९) यांनी मोलाचे योगदान दिले.
प्रत्युत्तरात हैदराबादकडून पहिलाच सामना खेळणाऱ्या जेसन रॉयनं ४२ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ६० धावा केल्या. केन विलियम्सननं ४१ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह नाबाद ५१ धावा, तर अभिषेक शर्मानं नाबाद २१ धावा करून हैदराबादचा विजय पक्का केला.
या विजयानंतर सर्वात जास्त आनंदी झाली असेल तर ती हैदराबादची मालकिण काव्या मारन ही. काव्या मारन ही कलानिधी मारन यांची मुलगी आणि माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारन यांची पुतणी आहे. २८ वर्षीय काव्या मारन स्वत: सन म्युझिक कंपनीची मालक आहे.
काव्या पहिल्यांदा २०१८ मध्ये सनराइजर्स हैदराबाद टीमला चिअर करण्यासाठी स्टेडिअमला आली होती. ती या टीमची सीईओ आहे. काव्याने MBA शिक्षण पूर्ण केल्यानंतर वडील कलानिधी मारन यांच्या व्यवसायात मदत करण्यासाठी पुढे आली. काव्याने कंपनीत मोठं पद घेण्यापूर्वी सन टीव्ही नेटवर्कमध्ये इंटर्नशिप केली होती.
काव्या सध्या सन टीव्ही नेटवर्कच्या ओटीटी प्लॅटफॉर्म सन नेक्स्ट Sun NXT ची प्रमुख आहे. काव्याने चेन्नईहून एमबीए शिक्षण पूर्ण केले आहे. काव्याचे फोटो पाहून अनेक चाहते तिच्यावर फिदा आहेत आणि आजच्या विजयानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल झाले आहेत.