Join us  

IPL 2021, Nathan Ellis : पंजाब किंग्सला थरारक विजय मिळवून देणारा गोलंदाजानं केलंय मजूराचं काम, तर कधीकाळी होता सहाय्यक शिक्षक!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 4:57 PM

Open in App
1 / 9

IPL 2021, PBKS : पंजाब किंग्सनं शनिवारी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघावर ५ धावांनी विजय मिळवला. १२६ धावांच्या लक्ष्याचा पंजाब किंग्सनं यशस्वी बचाव करून आयपीएल म्हणजे केवळ धावांचा पूर ही व्याख्या बदलून टाकली.

2 / 9

पंजाबचे युवा गोलंदाज रवी बिश्नोई, अर्षदीप सिंग व अनुभवी मोहम्मद शमी यांनी टिच्चून मारा करताना हैदराबादच्या डोळ्यांत पाणी आणलं. त्यात पंजाबनं कालच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा युवा गोलंदाज नॅथन एलिस याला खेळवलं आणि त्यानं अखेरच्या षटकात होल्डरला विजयापासून दूर ठेवत पंजाबला बाजी मारून दिली.

3 / 9

ऑस्ट्रेलियन गोलंदाज नॅथन एलिस हा बांगलादेशविरुद्धच्या पदार्पणाच्या ट्वेंटी-२० सामन्यात हॅटट्रिक घेऊन चर्चेत आला होता. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त पदार्पणात अशी कामगिरी करणारा तो जगातला पहिलाच गोलंदाज ठरला.

4 / 9

एलिसनं २०व्या षटकाच्या अखेरच्या तीन चेंडूंवर महमुदुल्लाह, मुस्ताफिजूर रहमान व महेदी हसन यांना बाद केले अन् विक्रम नोंदवला. ऑस्ट्रेलियाकडून ट्वेंटी-२० हॅटट्रिक घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी ब्रेट ली ( वि. बांगलादेश, २००७) आणि अॅश्टन अॅगर ( वि. द. आफ्रिका, २०२०) यांनी अशी कामगिरी केली आहे.

5 / 9

पंजाब किंग्सनं त्याला आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात आपल्या ताफ्यात करारबद्ध केले आणि सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध पदार्पणाची संधी दिली. २६ वर्षीय गोलंदाजानं त्याची निवड सार्थ ठरवली. पण, क्रिकेटपटू बनण्यासाठी त्यानं बरेच पापड लाटले आहेत.

6 / 9

''क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी २२ वर्षांचा असताना मी न्यू साऊथ वेल्स येथून तस्मानिया येथे स्थायिक झालो. कोणत्याही क्लबचा करार माझ्या हातात नव्हता आणि मी प्रथमच घरापासून लांब राहणार होतो. त्यामुळे खर्च होणार याची कल्पना होतीच,''असे त्यानं पंजाब किंग्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.

7 / 9

तो पुढे म्हणाला,''मी जवळपास ५-६ कामं केली. त्यातून राहण्याचा खर्च चालवला. मी landscapingचे काम केले, परंतु ते काम मी सोडलं, कारण मी शनिवारी काम करावं अशी त्यांची इच्छा होती आणि तेव्हा मला क्रिकेट खेळायचे होते. त्यानंतर मी फर्निचर हटवण्याचं किंवा बनवण्याचं कामही केलं, परंतु त्या कामाचा माझ्या क्रिकेट सामन्याची टकराव होत होता, म्हणून तेही काम सोडलं.''

8 / 9

''मजूराचंही काम केलं, परंतु त्यानं शरीर पूर्ण थकून जायचं आणि मला क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करता येत नव्हती. त्यानंतर हायस्कूलमध्ये सहाय्यक शिक्षकाचं काम मिळालं आणि नशिबानं त्याचा क्रिकेट सामन्यांवर परिणाम होत नव्हता,''असेही तो म्हणाला.

9 / 9

टॅग्स :आयपीएल २०२१पंजाब किंग्सआॅस्ट्रेलिया
Open in App