Join us  

IPL 2021 : MI Vs PBKS T20 Live : मुंबई इंडियन्सच्या किरॉन पोलार्डवर चाहते भडकले; रडीचा डाव खेळण्याने खडेबोल सुनावले!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 10:32 PM

Open in App
1 / 11

क्रिकेट हा जंटलमन गेम म्हणून ओळखला जातो. पण, यंदाच्या आयपीएलमध्ये फलंदाजांच्या रडीच्या डावावरुन रणकंदन पेटलेलं पाहायला मिळत आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या किरॉन पोलार्डनं केलेल्या कृतीनं सर्वांचे मन जिंकले होते. पण, आज त्याच पोलार्डला चाहत्यांचा रोषाचा सामना करावा लागत आहे.

2 / 11

मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians) सलामीवीर क्विंटन डी कॉक पुन्हा एकदा अपयशी ठरला. इशान किशनची बॅट यंदा रुसलेली दिसतेय. रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि सूर्यकुमार यादव यांनी मुंबईचा डाव सावरला. रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात सूर्या ३३ ( २७ चेंडूं, ३ चौकार व १ षटकार) धावांवर माघारी परतला.

3 / 11

रोहितसह त्यानं तिसऱ्या विकेटसाठी ५६ चेंडूंत ७९ धावांची भागीदारी केली. १८व्या षटकात मोहम्मद शमीनं MIला मोठा धक्का देताना, रोहित शर्माला ६३( ५२ चेंडू, ५ चौकार व २ षटकार) धावांवर माघारी पाठवले. फॅबियन अॅलननं सीमारेषेनजीक त्याचा सुरेख झेल टिपला. मुंबईला २० षटकांत ६ बाद १३१ धावांवर समाधान मानावे लागले. पोलार्ड १२ चेंडूंत १ षटकारासह १६ धावांवर नाबाद राहिला.

4 / 11

या सामन्यात पोलार्ड नॉन स्ट्रायकर एंडला असताना गोलंदाज चेंडू टाकण्यापूर्वीच क्रिज सोडत असल्याचे वारंवार दिसले. त्यावरून नेटिझन्सनी त्याला झोडपले. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात शिखर धवनला याच पोलार्डनं गोलंदाजी करताना वॉर्निंग दिली होती.

5 / 11

काही दिवसांपूर्वी ग्लेन मॅक्सवेलच्या याच कृतीवर हर्षाभोगले व वेंकटेश प्रसाद यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती आणि मंकडिंग करण्याची परवानगी द्या अशी मागणी केली होती

6 / 11

7 / 11

8 / 11

9 / 11

10 / 11

11 / 11

टॅग्स :आयपीएल २०२१किरॉन पोलार्डमुंबई इंडियन्सपंजाब किंग्स