Join us

IPL 2021: 'राहुल...नाम तो सुना ही होगा', धोनीच्या शहराशी विशेष नातं अन् IPL मध्ये धावांचा पाऊस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 16:15 IST

Open in App
1 / 9

राहुल त्रिपाठी गेल्या बऱ्याच वर्षांपासून आयपीएलमध्ये खेळतोय. खोऱ्यानं धावा करतोय पण प्रत्येक सीझनमध्ये त्याच्या कामगिरीत चढउतार पाहायला मिळाले आहेत. यावेळी राहुल गृहपाठ पक्का करुनच मैदानात उतरलेला दिसतो आहे.

2 / 9

राहुल त्रिपाठीनं मुंबई इंडियन्सच्या गोलदाजांची अक्षरश: पिसं काढली. त्यानं ४२ चेंडूत ३ उत्तुंग षटकार आणि ८ चौकारांच्या साथीनं नाबाद ७४ धावांची खेळी साकारली. पण त्यानं अशी कामगिरी काही पहिल्यांदा केलीय असंही नाही.

3 / 9

महेंद्रसिंग धोनी ज्या शहरातून आलाय त्याच रांचीमध्ये राहुल त्रिपाठीचाही जन्म झाला आहे. २०१७ साली त्रिपाठीनं आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. रायझिंग पुणे सुपरजाएंट्सनं राहुल त्रिपाठीला संधी दिली होती. १० लाख रुपयांच्या बेस प्राइजमध्येच राहुल त्रिपाठीला संघात दाखल करुन घेण्यात आलं होतं आणि त्यानं पैसा वसुल कामगिरी केली होती.

4 / 9

राहुल त्रिपाठीनं आपल्या पहिल्याच सीझनमध्ये १४ सामन्यांमध्ये ३९१ धावा कुटल्या होत्या. यात १४६.४४ इतका जबरदस्त स्ट्राइक रेट होता. विशेष म्हणजे त्रिपाठीनं आपल्या पहिल्याच सीझनमध्ये ९३ धावांची तुफान खेळी साकारली होती.

5 / 9

त्यानंतर वर्ष उलटलं तसं त्रिपाठीचा संघ देखील बदलला. नव्या सीझनममध्ये नव्या संघासाठी त्रिपाठीवर कोट्यवधींची उधळण झाली. राजस्थान रॉयल्सनं त्रिपाठीवर ३.४० कोटींची बोली लावून संघात दाखल करुन घेतलं होतं. पण या सीझनमध्ये तो काही विशेष छाप पाडू शकला नव्हता.

6 / 9

२०१८ साली १२ सामन्यांमध्ये २२६ धावा त्रिपाठीनं केल्या होत्या. तर २०१९ मध्ये तर त्याच्या कामगिरीत आणखी उतार पाहायला मिळाला. राहुलच्या बॅटमधून फक्त १४१ धावा निघाल्या होत्या.

7 / 9

२०१९ साली राजस्थाननं त्रिपाठीला करारमुक्त केलं आणि २०२० साली कोलकाता नाइट रायडर्स त्रिपाठीवर विश्वास दाखवत संघात दाखल करुन घेतलं. त्रिपाठीला ६० लाखांच्या बोलीवर कोलकातानं विकत घेतलं.

8 / 9

राहुल त्रिपाठीनं पुनरागमन करत चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्धच्या सामन्यात ५१ चेंडूत तडफदार ८१ धावांची खेळी साकारली. याच ८ चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. दोन वर्षांपासून निराशाजनक कामगिरीचा ठपका आता त्रिपाठीनं पुसून टाकला होता. २०२० मध्ये तो ८ सामने खेळला आणि यात १२७ च्या स्ट्राइकरेटनं एकूण २३० धावा केल्या.

9 / 9

आता यंदाच्या सीझनमध्ये त्रिपाठीनं पुन्हा एकदा दमदार फलंदाजीला सुरुवात केलेली दिसत आहे. या सीझनमध्ये त्रिपाठीनं आतापर्यंत तब्बल २६१ धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या खेळीनं त्यानं पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं आहे.

टॅग्स :आयपीएल २०२१कोलकाता नाईट रायडर्स
Open in App