Join us  

IPL 2021 Auction : लसिथ मलिंगाच्या जागी कोण?; Mumbai Indians या ७ खेळाडूंवर लावणार बोली!

By स्वदेश घाणेकर | Published: February 17, 2021 1:08 PM

Open in App
1 / 10

Mumbai Indians will bid for this 7 players इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League 2021) १४व्या पर्वासाठी होणाऱ्या ऑक्शनमध्ये ८ फ्रँचायझी २९२ खेळाडूंवर बोली लावणार आहेत. आयपीएल २०२१च्या मिनी ऑक्शनसाठीच्या ६१ रिक्त जागांसाठी २९२ खेळाडू शर्यतीत आहेत आणि फ्रँचायझीच्या पर्समध्ये १९६.६ कोटी आहेत.

2 / 10

चेन्नईत गुरुवारी हे ऑक्शन होणार आहे. अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) ही यादीत असल्यानं मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) त्याला ताफ्यात घेणार का?; याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सनं ( MI) लसिथ मलिंगासह सात खेळाडूंना रिलीज केलं आहे.

3 / 10

मुंबई इंडियन्सनं आयपीएल ऑक्शनपूर्वी लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेघन, जेम्स पॅटीन्सन, नॅथन कोल्टर नायल, शेर्फाने रुथरफोर्ड, प्रिन्स बलवंत राय, दिग्विजय देशमुख या सात खेळाडूंना रिलीज केलं आहे.

4 / 10

लसिथ मलिंगाच्या जागी डेल स्टेन ( परदेशी),लसिथ मलिंगानं व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यामुळे आता तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. पण, त्याची जागा अनुभवी डेल स्टे घेऊ शकतो.

5 / 10

मिचेल मॅक्लेघन याच्या जागी इंग्लंडचा खेळाडू हॅरी गुर्ने याची निवड केली जाऊ शकते. कोलकाता नाईट रायडर्सनं त्याला रिलीज केलं आहे.

6 / 10

नॅथल कोल्टर नाइलच्या जागी श्रीलंकेचा इसरू उडाना याची निवड होऊ शकते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना त्यानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

7 / 10

जेम्स रुदरफोर्डच्या जागी वेस्ट इंडिजच्या किमो पॉलला संधी दिली जाऊ शकते. किमो पॉल अखेरच्या षटकांत चांगली गोलंदाजी करू शकतो.

8 / 10

जेम्स पॅटिन्सन याला पर्याय म्हणून मुंबई इंडियन्स उमेश यादव याचा विचार करण्याची शक्यता अधिक आहे.

9 / 10

दिग्विजय देशमुखच्या जागी २०१७मध्ये पदार्पण करणाऱ्या पृथ्वीराज यर्रे याची निवड होऊ शकते.

10 / 10

बलवंर राय सिंह याच्या जागी किंग्स इलेव्हन पंजाबच्या तेजेंद्र ढिल्लो याचा विचार होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :आयपीएल २०२१ मिनी ऑक्शनमुंबई इंडियन्सलसिथ मलिंगा