SRHला ८ बाद ११५ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडल्यानंतर KKRनं शुबमन गिलच्या अर्धशतकाच्या जोरावर हा सामना जिंकला. KKRच्या गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
सनरायझर्स हैदराबादच्या आणखी एका पराभवानंतर सर्वांच्या नजरा मालकिणबाई काव्या मारन ( Kavya Maran) हिला शोधू लागल्या. पण, आज हैदराबादच्या VIP गेस्ट बॉक्समध्ये काव्या मारन नाही तर दुसऱ्याच VIP बालानं सर्वांचे लक्ष वेधले.
गुलाबी टॉप अन् जिन्स घातलेली ती तरुणी हैदराबादला चिअर करत होती.
तिच्या स्माईली लूकनं अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवला अन् ती नेमकी आहे तरी कोण याचा शोध सुरू झाला.
ती सामान्य तरुणी नाहीतर दाक्षिणात्य अभिनेत्री आहे आणि अश्रिता शेट्टी ( Ashrita Shetty ) असे तिचे नाव आहे.
अश्रिता ही सनरायझर्स हैदराबादचा व भारतीय संघाचा मधल्या फळीचा फलंदाज मनीष पांडे याची पत्नी आहे.
मनीष पांडे व अश्रिता शेट्टी यांनी मुंबईत 2 डिसेंबर 2019 मध्ये विवाह केला.
30 वर्षीय मनीषने दाक्षिणात्य अभिनेत्रीशी विवाह केला. मागील काही कालावधीपासून अश्रिता आणि मनीष हे रिलेशनशिपमध्ये आहेत.
26 वर्षी अश्रितानं Indrajith, Oru Kanniyum Moonu Kalavaanikalum आणि Udhayam NH4 आदी अनेक चित्रपटांत काम केले आहे.