Join us  

IPL Auction 2021 : मोहम्मद अझरुद्दीनसह १० अनकॅप खेळाडूंसाठी फ्रँचायझी पाडणार पैशांचा पाऊस!

By स्वदेश घाणेकर | Published: February 01, 2021 10:31 AM

Open in App
1 / 12

गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्याच्या जोरावर बडोदा संघाला माफक धावसंख्येत रोखल्यानंतर तामिळनाडूने नियोजनात्मक फलंदाजी करत दिमाखात ७ विकेट्सनं विजय मिळवला आणि सय्यद मुश्ताक अली टी-२० ( SYED MUSHTAQ ALI TROPHY, 2020/21 ) स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. तामिळनाडूने स्पर्धेच्या इतिहासात दुसऱ्यांदा जेतेपदाचा मान मिळवला.

2 / 12

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League 2021) १४व्या पर्वापूर्वी झालेल्या या स्थानिक ट्वेंटी-20 स्पर्धेतून अनेक खेळाडूंनी फ्रँचायझींचे लक्ष वेधले आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीवर सर्व फ्रँचायझी बारीक लक्ष ठेवून होते आणि त्यामुळे मुंबई इंडियन्सनं नागालँडच्या १६ वर्षीय फिरकीपटूला ट्रायलसाठी बोलावले. आता १८ फेब्रुवारीला होणाऱ्या IPL 2021 Auctionमध्ये ही स्पर्धा गाजवणाऱ्या या १० खेळाडूंसाठी फ्रंचायझी मोठी बोली लावू शकतात.

3 / 12

केदार देवधर ( Kedar Devdhar ) - स्थानिक स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या केदार देवधरच्या नेतृत्वाखाली बडोदा संघानं अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं ८ सामन्यांत ३४९ धावा कुटल्या. नाबाद ९९ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली.

4 / 12

अबी बारोत ( Avi Barot ) - सौराष्ट्र संघाचा हा यष्टिरक्षक-फलंदाज सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथ्या स्थानावर आहे. त्यानं ५ सामन्यांत २८३ धावा कुटल्या आहेत.

5 / 12

राहुल सिंग ( Rahul Singh ) - पाच सामन्यांत यानं १७६.८१च्या स्ट्राईक रेटनं २४४ धावा केल्या आहेत. सर्व्हिसच्या या फलंदाजानं १०६ धावांची स्फोटक खेळीही केली.

6 / 12

शेल्डन जॅक्सन ( Sheldon Jackson ) - स्थानिक क्रिकेटमध्ये हे नाव काही नवीन नाही. पण, या मोसमात पुद्दुचेरी संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यानं १५५.१२च्या स्ट्राईक रेटनं २४२ धावा केल्या आहेत.

7 / 12

प्रेरक मंकड ( Prerak Mankad ) - सौराष्ट्राच्या या खेळाडूनं १८१.४१च्या स्ट्राईक रेटनं फटकेबाजी केली आणि ५ सामन्यांत २०५ धावा केल्या.

8 / 12

वेंकटेश अय्यर ( Venkatesh Iyer ) - मध्य प्रदेशच्या या खेळाडूनं २२७ धावा केल्या आहेत आमइ दोन विकेट्सही घेतल्या आहेत.

9 / 12

मोहम्मद अझरुद्दीन ( Mohammed Azharuddeen ) - केरळच्या या यष्टिरक्षक-फलंदाजानं मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली होती. त्याच्या नाबाद १३७ धावांच्या खेळीनं मुंबईच्या गोलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले होते. अझरुद्दीननं २१४ धावा केल्या आहेत.

10 / 12

आशुतोष अमन ( Ashutosh Aman ) - या फिरकी गोलंदाजानं ६ सामन्यांत १६ विकेट्स घेतल्या आहेत. त्यात दोन वेळा त्यानं ४-४ विकेट्स घेतल्या आहेत.

11 / 12

लकमन मेरिवाला ( Lukman Meriwala ) - बडोदाच्या या गोलंदाजानं ७ सामन्यांत १४ विकेट्स घेतल्या.

12 / 12

चेतन साकरिया ( Chetan Sakariya ) - २२ वर्षीय लेफ्ट हँड गोलंदाजानं विदर्भविरुद्ध पाच विकेट्स घेत सर्वांचे लक्ष वेधले.

टॅग्स :आयपीएल २०२१ मिनी ऑक्शनआयपीएलटी-20 क्रिकेट