Join us  

आयपीएल 2020 च्या आयोजनाचा प्रस्ताव ठेवलेला नाही; या देशानं फेटाळलं वृत्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 1:34 PM

Open in App
1 / 9

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 13व्या मोसमाच्या आयोजनासाठी कंबर कसली आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या निर्णयाची वाट न पाहता बीसीसीआयनं आयपीएल आयोजनाच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

2 / 9

भारतातील कोरोना रुग्णांची वाढती लक्षात घेता, यंदाचा आयपीएल परदेशात होण्याची शक्यता अधिक आहे. बीसीसीआयसमोर संयुक्त अरब अमिराती, श्रीलंका आणि न्यूझीलंड यांचे पर्याय होते. पण, आता असा प्रस्ताव पाठवलाच नसल्याचा दावा एका देशानं केला आहे.

3 / 9

कोरोना व्हायरसमुळे दोन वेळा आयपीएल स्थगित करावी लागली. आता सप्टेंबर-नोव्हेंबर या कालावधीत ती खेळवण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. त्यासाठी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेबाबतच्या निर्णयाची त्यांना प्रतीक्षा आहे.

4 / 9

सद्यस्थिती पाहता ऑस्ट्रेलियात ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा आयोजित होण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या आयपीएल आयोजनाच्या आशा बळावल्या आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाकडूनही वर्ल्ड कप होणे शक्य नसल्याची विधानं आली होती.

5 / 9

आयपीएलसाठी संयुक्त अरब अमिरातीनं प्रस्ताव ठेवला होता. 2014मध्ये देशात निवडणुका झाल्यामुळे त्यावर्षी 20 सामने संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात आले होते.

6 / 9

श्रीलंकेनंही आयपीएल आयोजनाची तयारी दर्शवली आहे. तेथे कोरोना रुग्णांची संख्या फार कमी आहे आणि त्यांच्या सरकारनं लॉकडाऊनही उठवला आहे. पण, तरीही बीसीसीआय संयुक्त अरब अमिरातीलाच पसंती देण्याची शक्यता अधिक आहे.

7 / 9

श्रीलंका आणि युएई यांच्यानंतर न्यूझीलंडनंही आयपीएल आयोजनाची उत्सुकता दर्शवली होती. पण, न्यूझीलंडनं हे वृत्त फेटाळून लावलं आहे.

8 / 9

न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचे प्रवक्ते रिचर्ड बूक यांनी सांगितले की, त्या निव्वळ अफवा होत्या. आम्ही आयपीएल आयोजनाचा कोणताही प्रस्ताव ठेवलेला नाही किंवा त्याबाबत आम्ही बीसीसीआयशी चर्चाही केलेली नाही.''

9 / 9

न्यूझीलंडमध्ये आयपीएल खेळवणं बीसीसीआयसाठी आव्हानच ठरलं असतं. कारण दोन्ही देशांमध्ये सातेसात तासांचा फरक आहे आणि तेथे आयपीएल खेळवून बीसीसीआयला व्ह्यूवर्स मिळाले नसले.

टॅग्स :आयपीएल 2020श्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीन्यूझीलंड