याचा आयपीएल स्पर्धेवर कोणताही परिणाम होणार नाही. अजून 20 दिवसांचा कालावधी आहे. त्यात चेन्नईच्या सर्व खेळाडूंची पुन्हा चाचणी होईल. तीन निगेटिव्ह रिपोर्टनंतरच खेळाडूंना मैदानावर परतण्याची परवानगी मिळेल.
इंडियन प्रीमिअर लीगचे ( आयपीएल ) 13वे हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे, तरीही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून ( बीसीसीआय) वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही.
19 सप्टेबंर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती येथे ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. आयपीएलसाठी सर्व संघ दुबईत दाखल झाले आहेत आणि सहा दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून सरावालाही सुरुवात केली आहे.
पण, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचा ( CSK) संघ पुन्हा क्वारंटाईन झाला आहे. त्यांच्या ताफ्यातील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. आता पुढे काय? आयपीएलवर ओढावलं का संकट?
अन्य संघांप्रमाणे शुक्रवारी चेन्नईचे खेळाडू सरावासाठी मैदानावर उतरणे अपेक्षित होते, परंतु खेळाडूंचा क्वारंटाईन कालावधी वाढवण्यात आला. टाईम्स ऑफ इंडियानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दुबईत पोहोचल्यानंतर करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत CSKचा एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले.
''युरोपात फुटबॉलच्या सामन्यांची सुरूवात झाली, तेव्हाही काही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानुसार आयपीएलमधील 8 फ्रँचायझींची 1000 हून अधिक सदस्य आहेत आणि येथेही तशी शक्यता नाकारता येत नाही. कोणत्याही संघासोबत असं घडू शकतं. सर्व प्रकारची खबरदारी घेतल्यानंतर आमचा एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळला, हे दुर्दैव म्हणावं लागेल,''असं सूत्रांनी सांगितले.