Join us

IPL 2020 : आयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद होणारा इशान तिसरा फलंदाज, यापूर्वी या दिग्गजांवर ओढवली होती नामुष्की

By बाळकृष्ण परब | Updated: September 29, 2020 13:44 IST

Open in App
1 / 7

आयपीएलमध्ये काल रात्री झालेल्या अत्यंत रोमांचक लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सवर मात केली. धावांचा वर्षाव झालेल्या या लढतीत युवा इशान किशनने केलेली फटकेबाजी कौतुकाचा विषय ठरली होती.

2 / 7

बंगळुरूने दिलेल्या २०२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात निराशाजनक झाली होती. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, क्विंटन डिकॉक आणि हार्दिक पांड्या झटपट बाद झाल्यानंतर किशनने कायरन पोलार्डसोबत जबरदस्त भागीदारी करत मुंबईला सामन्यात कमबॅक करून दिले होते.

3 / 7

मात्र जबदस्त खेळी करणारा इशांत किशन आपले शतक पूर्ण करू शकला नाही. अखेरच्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या नादात तो ९९ धावांवर बाद झाला.

4 / 7

आयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद होणारा इशांत किशन हा आतापर्यंतच्या इतिहासातील तिसरा फलंदाज ठरला आहे. या स्पर्धेत यापूर्वी दोन फलंदाजांवर ९९ धावांवर बाद होण्याची नामुष्की ओढवली होती.

5 / 7

आयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद होणारा पहिला खेळाडू ठरला होता तो म्हणजे विराट कोहली. २०१३ च्या हंगामात दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धच्या लढतीत विराट कोहली ९९ धावांवर बाद झाला होता.

6 / 7

तर आयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद होणारा दुसरा फलंदाज ठरण्याची नामुष्की ओढवली होती ती दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ याच्यावर. गतवर्षी कोलकाता नाईटरायडर्सविरुद्धच्या लढतीत पृथ्वी शॉ हा ९९ धावांवर बाद झाला होता.

7 / 7

टॅग्स :IPL 2020मुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर