श्रीलंकेचाअनुभवी क्रिकेटपटू अँजेलो मॅथ्यूजला आयपीएलच्या लिलावासाठी चांगलीच बेस प्राइस मिळाली आहे. पण त्याचा फॉर्म पाहता त्याला कोणताही संघ घेणार नाही, असे वाटत आहे.
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू शॉन मार्श हा किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये होता. पण या हंगामात त्याला कोणी वाली मिळेल, असे वाटत नाही.
चेन्नई सुपर किंग्सकडून डेव्हिड विली खेळत होता. पण तो सध्या चांगल्या फॉर्मात नाही. त्यामुले लिलावात त्याचे नाव मागे पडू शकते.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल मार्शकडून सध्या चांगली कामगिरी होताना दिसत नाही. त्यामुळे यंदाच्या आयपीएल लिलावात त्याची वर्णी लागणे कठीण असल्याचे समजते.
ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्शला आपली छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे यंदाच्या आयपीएल २०२० लिलावात त्याला कोणी संघात घेईल, असे वाटत नाही.