Join us

IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्स करणार मेकओव्हर; IPL 2021 Auctionमध्ये 'या' खेळाडूंना करणार रिलीज!

By स्वदेश घाणेकर | Updated: October 20, 2020 16:50 IST

Open in App
1 / 12

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) बाबतीत अनपेक्षित निकाल पाहायला मिळाला. IPLच्या इतिहातास आतापर्यंत जे घडले नव्हते ते महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) संघासोबत घडले.

2 / 12

IPL च्या प्रत्येक पर्वात Play Off पर्यंत मजल मारणाऱ्या CSKला प्रथमच अपयश पचवावे लागले. राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि CSK या दोन्ही संघांसाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. त्यामुळे सामना चुरशीचा होईल, अशी सर्वांना अपेक्षा होती. पण, धोनीच्या संघातील महारथींनी पाट्या टाकल्या आणि एकतर्फी झालेल्या सामन्यात RRनं बाजी मारून प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले.

3 / 12

IPL 2020मधील अपयशानंतर पुढील मोसमासाठी संघात बदल करणार असल्याचे संकेत प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी दिले आहेत. डॅडी आर्मी म्हणून ओळख असलेल्या चेन्नई सुपर किंग्सला या पराभवानंतर १० सामन्यांत ७ पराभवासह तळाला समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे त्यांच्या प्ले ऑफच्या आशाही जवळपास मावळल्या आहेत.

4 / 12

IPL 2021 Auction साठी कोणत्या खेळाडूंना करणार रिलीज?

5 / 12

हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांचा तीन वर्षांचा करार कधीच संपुष्टात आलेला आहे. त्यात या दोघांनी यंदाच्या मोसमातून वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्यानं त्यांचे CSKतील परतीचे दरवाजे बंद झाले आहेत.

6 / 12

शेन वॉटसन यालाही यंदा नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यानं १० सामन्यांत ३१.६६च्या सरासरीनं २८५ धावा केल्या आहेत. नाबाद ८३ ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. पण, १० सामन्यांत त्यानं एकदाही गोलंदाजी केलेली नाही.

7 / 12

केदार जाधव हा यंदा सर्वांच्या टीकेचा धनी बनला आहे. संघात नेमकं त्याची भूमिका काय, असा प्रश्न पडलेला आहे. ८ सामन्यांत त्याला ६० धावाच करता आल्या आहेत आणि त्यानंही गोलंदाजी केलेली नाही. त्याचं वय लक्षात घेता पुढील मोसमात संघ त्याला कायम ठेवेल याची शक्यता फार कमीच आहे.

8 / 12

पीयूष चावला याला चेन्नई सुपर किंग्सनं ६.७५ कोटींत आपल्या ताफ्यात घेतले, परंतु ७ सामन्यांत त्याला ६ विकेट घेता आल्या आहेत. ३२ वर्षीय पीयूषलाही चेन्नई रिलीज करण्याची शक्यता अधिक आहे.

9 / 12

दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहीर यंदा एकही सामना खेळलेला नाही. तो आता ४२ वर्षांचा आहे आणि पुढील मोसमात त्याचा विचार केला जाईल, असे वाटत नाही.

10 / 12

अंबाती रायुडूनं चांगली कामगिरी केली असली तरी क्षेत्ररक्षणात तो तितका चपळ दिसला नाही. त्यानं सोडलेल्या झेल संघाला किती महागात पडल्यात हे सर्वांना माहित आहेच.

11 / 12

फॅफ ड्यू प्लेसिस हा संघासाठी हुकमी एक्का ठरला आहे. त्याच्या फिटनेसबाबत कोणालाही तिळमात्र शंका नाही. ऑरेंज कॅप शर्यतीत तो सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. पण, तरीही पुढील मोसमात त्याला संघात कायम ठेवण्याची शक्यता कमीच आहे.

12 / 12

महेंद्रसिंग धोनी हा चेन्नई सुपर किंग्सचा आजीवन सदस्य असला तरी तो पुढील मोसमात दुसऱ्या भूमिकेत दिसू शकतो. तो मैदानावर खेळताना दिसण्याची शक्यता फार कमीच आहे.

टॅग्स :IPL 2020चेन्नई सुपर किंग्सएफ ड्यु प्लेसीसशेन वॉटसनमहेंद्रसिंग धोनीसुरेश रैनाहरभजन सिंगकेदार जाधवअंबाती रायुडू