Join us  

IPL 2020: १०.७ कोटी अन् फक्त ५८ धावा; फ्रँचायझींचा खिसा रिकामी करणाऱ्या खेळाडूंची कशी झालीय कामगिरी?

By स्वदेश घाणेकर | Published: October 20, 2020 4:08 PM

Open in App
1 / 9

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. यूएईत सुरू असलेल्या या लीगसाठी सर्व फ्रँचायझींनी आपापल्या ताफ्यात तगड्या खेळाडूंना दाखल करून घेतले आहे. पॅट कमिन्स हा IPL 2020 Auction मधील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. पण, त्याला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. IPL 2020 Auction मधील टॉप आठ महागड्या खेळाडूंची कशी झालीय आतापर्यंतची कामगिरी, चला जाणून घेऊया...

2 / 9

पॅट कमिन्स ( Pat Cummins) - कोलकाता नाईट रायडर्सनं ऑस्ट्रेलियन गोलंदाजासाठी सर्वाधिक १५.५ कोटी रुपये मोजले. पण, त्याला ९ सामन्यांत केवळ ३ विकेट्स घेता आल्या आहेत. दुसरी फलंदाजीत तो संघासाठी उपयुक्त ठरला आहे. ९ सामन्यांत त्यानं एका अर्धशतकासह ३१.५०च्या सरासरीनं १२६ धावा केल्या आहेत.

3 / 9

ग्लेन मॅस्कवेल ( Glenn Maxwell) - किंग्स इलेव्हन पंजाबनं १०.७५ कोटींत ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूला आपल्या ताफ्यात घेतले. त्याला ९ सामन्यांत ११.६०च्या सरासरीनं फक्त ५८ धावा करता आल्या आहेत.

4 / 9

ख्रिस मॉरिस ( Christopher Morris) - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं मॉरिससाठी १० कोटी रुपये मोजले. फलंदाजीत त्यानं ४ सामन्यांत २५ धावा केल्या आहेत, तर गोलंदाजीत ९ विकेट्स नावावर आहेत.

5 / 9

शेल्डन कोट्रेल ( Sheldon Cottrell) - किंग्स इलेव्हन पंजाबच्या या गोलंदाजाची राजस्थान रॉयल्सच्या राहुल टेवाटियानं केलेली धुलाई कोणीच विसरू शकणार नाही. वेस्ट इंडिजच्या या गोलंदाजासाठी फ्रँचायझीने ८.५० कोटी रुपये मोजले. त्याने ६ सामन्यांत ६ विकेट घेतल्या आहेत. ८.८०च्या इकॉनॉमीनं धावा दिल्या आहेत.

6 / 9

नॅथन कोल्टर-नायल ( Nathan Coulter-Nile) - मुंबई इंडियन्सनं कोल्टर-नायलला अजून खेळण्याची फार संधी दिली नाही. त्याच्यासाठी मुंबईने ८ कोटी मोजले. त्यानं २ सामन्यांत १ विकेट घेतली आहे.

7 / 9

शिमरोन हेटमायर ( Shimron Hetmyer) - वेस्ट इंडिजच्या या स्फोटक फलंदाजासाठी दिल्ली कॅपिटल्सनं ७.७५ कोटी मोजले. दुखापतीमुळे त्याला काही सामन्यांना मुकावे लागले आहे. त्यानं ६ सामन्यांत ९१ धावा केल्या आहेत. ४५ ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

8 / 9

पीयूष चावला ( Piyush Chawla) - चेन्नई सुपर किंग्सनं फिरकीपटूला का घेतले, हा प्रश्न आता अनेकांना पडला असेल. ६.७५ कोटी या फिरकीपटूसाठी CSKने मोजले. ७ सामन्यांत त्याला ६ विकेट घेता आल्या आहेत.

9 / 9

सॅम कूरन ( Sam Curran) - चेन्नई सुपर किंग्सला गवसलेला फ्युचर स्टार... इंग्लंडच्या या गोलंदाजानं आतापर्यंत साजेशी कामगिरी केली आहे. ५.५० कोटींत महेंद्रसिंग धोनीच्या संघात त्यानं एन्ट्री घेतली. १० सामन्यांत १० विकेट्स अन् १२१ धावा त्यानं केल्या आहेत.

टॅग्स :IPL 2020ग्लेन मॅक्सवेलकोलकाता नाईट रायडर्समुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्सचेन्नई सुपर किंग्स