बंगळुरुविरुद्धचा सामना मुंबईने अखेरच्या चेंडूवर जिंकला. पण हा चेंडू नो बॉल असल्याचे सामन्यानंतर पाहायला मिळाले.
या आठवड्यात सर्वात चर्चेचा विषय ठरला तो आर. अश्विनने केलेला रनआऊट. मांकड नियमानुसार अश्विनने जोस बटलरला रनआऊट केले आणि हा विषय चांगलाच चघळला गेला.
कोलकाताचा धडाकेबाज फलंदाज आंद्रे रसेलला पंजाबच्या मोहम्मद शमीने त्रिफळाचीत केले. पण यावेळी सहा खेळाडू सीमारेषेजवळ असल्याने रसेलला नाबाद देण्यात आले.
पहिल्याच सामन्यात जसप्रीत बुमराच्या खांद्याला दुखापत झाली. त्यानंतर बुमरा विश्वचषकात खेळणार की नाही, याबाबत चर्चा सुरु झाली. पण त्यानंतर बुमरा दुसऱ्या सामन्यातही खेळला होता.
जसप्रीत बुमरा आणि विराट कोहली यांच्यातील शाब्दिक चकमक एका जाहिरातीमध्ये पाहायला मिळाली. पण मैदानात मात्र त्यांच्यामध्ये कुठलेच शत्रूत्व नसल्याचे पाहायला मिळाले.