Join us  

IPL 2019: मुंबईकडून पदार्पणातच विक्रम नोंदवणारा रसिख सलाम आहे तरी कोण ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 11:56 AM

Open in App
1 / 9

मुंबई, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीगच्या पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला. दिल्ली कॅपिटल्स संघाने वानखेडे स्टेडियमवर विजय मिळवत मुंबईच्या चाहत्यांना निराश केले. पण या सामन्यात मुंबईकडून पदार्पण करणाऱ्या रसिख सलाम दार या १७ वर्षीय खेळाडूने सर्वांची उत्सुकता ताणली. मुख्य इंडियन्सकडून पदार्पण करणारा तो सर्वात युवा खेळाडू ठरला.

2 / 9

१७ वर्ष आणि ३५३ दिवसांचा रसिख हा मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करणारा युवा खेळाडू ठरला

3 / 9

दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्यातील अशमुजी या गावातील त्याचा जन्म

4 / 9

१९ वर्षांखालील कूच बिहार स्पर्धेदरम्यान मुंबई इंडियन्सने रसिखला हेरले.

5 / 9

मुंबई इंडियन्सच्या नवी मुंबईत झालेल्या निवड चाचणीत रसिखने भाग घेतला होता.

6 / 9

मुंबई इंडियन्सने त्याला २० लाखांत आपल्या चमूत दाखल करून घेतले.

7 / 9

परवेझ रसूल याच्यानंतर आयपीएलमध्ये खेळणारा रसिख हा जम्मू काश्मीरचा दुसरा खेळाडू आहे. रसूलने आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.

8 / 9

रसिखने पहिल्याच सामन्यात 4 षटकांत 42 धावा दिल्या.

9 / 9

टॅग्स :मुंबई इंडियन्सआयपीएलआयपीएल 2019