यंदाच्या हंगामात भुवनेश्वर कुमारकडे हैदराबादचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. संघ चांगली कामगिरी करत असला तरी त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
राजस्थान रॉयल्सने जयदेव उनाडकटला संघात घेताना मोठी रक्कम मोजली होती. पण त्याला अजूनही चांगली कामगिरी करता आलेली नाही.
चेन्नई सुपर किंग्सच्या अंबाती रायुडूला अजूनही सूर गवसलेला नाही.
वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज म्हणजे सिमरॉन हेटमायर. पण आरसीबीकडून खेळताना त्याला लय सापडलेली नाही.