चेन्नई सुपर किंग्सने मंगळवारी कोलकाता नाइट रायडर्सवर 7 विकेट राखून विजय मिळवला. या सामन्यात चेन्नईचा गोलंदाज दीपक चहल मॅन ऑफ दी मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने 4 षटकांत 20 धावा देत 3 विकेट घेतल्या.
दीपक चहरच्या गोलंदाजीच्या जोरावर चेन्नईने कोलकाताला 20 षटकांत 9 बाद 108 धावांवर रोखले आणि 17.2 षटकांत हे लक्ष्य पार केले.
दीपकने या चार षटकांत 20 डॉट बॉल टाकले. आयपीएलच्या एका सामन्यात सर्वाधित डॉट बॉल टाकण्याचा विक्रम त्याने नावावर केला.
याआधी हा विक्रम मुनाफ पटेल आणि आशिष नेहरा यांच्या नावावर होता. दोघांनी 19 डॉट बॉल टाकले होते.
20 डॉट बॉल टाकूनही दीपक चहरने एकही निर्धाव षटक टाकले नाही. त्याच्या चार षटकांत चारच चेंडूंवर धावा झाल्या. त्याच्या पहिल्या षटकात 5 ( 4 ओवर थ्रो), दुसऱ्या षटकात एक वाईड, तिसऱ्या षटकात दोन चौकार व चौथ्या षटकात 1 षटकार लागला.