आयपीएलच्या पुढच्या मोसमात पुनरागमन करणा-या चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांना त्यांचे तीन प्लेयर्स परत मिळणार आहेत.
आयपीएलच्या संचालन परिषदेने या दोन संघांना त्यांचे तीन जुने खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी दिली आहे. सट्टेबाजी प्रकरणातील सहभागामुळे या दोन संघांवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती.
या निर्णयामुळे महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई सुपर किंग्जकडून खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आयपीएलची दोन विजेतेपद मिळवली होती.