Join us  

International Left Handers Day : 'हे' डावखुरे ठरले मैदानात उजवे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 5:32 PM

Open in App
1 / 5

सौरव गांगुली : भारताचा आक्रमक कर्णधार म्हणून सौरव गांगुलीचे डाव घेतले जाते. गांगुली हा डावखुरा फलंदाज होता. ऑफ साईडला गांगुलीचे फटके हे नजरेचे पारणे फेडणारे होते.

2 / 5

युवराज सिंग : क्रिकेट जगतामध्ये 'सिक्सर किंग' या नावाने युवराज सिंग प्रसिद्ध होता. युवराजने निवृत्ती घेतली असली तरी त्याची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. २००७ साली झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात युवराजने सहा चेंडूंत सहा षटकार लगावले होते. त्याचबरोबर २०११ साली झालेल्या विश्वचषकात युवराज सर्वोत्तम खेळाडू ठरला होता.

3 / 5

ब्रायन लारा : वेस्ट इंडिजचा माजी महान फलंदाज ब्रायन लाराची फलंदाजी पाहणे, हा एक सोहळा होता. कारण त्याच्या खेळीत जबरदस्त नजाकत होती. कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्येचा विश्वविक्रम अजूनही लाराच्याच नावावर आहे.

4 / 5

कुमार संगकारा : श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू कुमार संगकारा हा संघाचा कणा समजला जायचा. संगकाराने आतापर्यंत संघाला बरेच विजय मिळवून दिले होते. संगकारा आणि महेला जयवर्धने यांची जोडी चांगलीच गाजली होती.

5 / 5

मॅथ्यू हेडन : ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनच्या फलंदाजीची बऱ्याच गोलंदाजांना धडकी भरायची. आपल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर हेडनने क्रिकेट विश्वामध्ये आपली खास ओळख निर्माण केली होती.

टॅग्स :सौरभ गांगुलीयुवराज सिंगकुमार संगकारा