Rohit Sharma Mumbai House Inside Photos: मुंबईत २९व्या मजल्यावरील आलिशान घरात राहतो रोहित, बाल्कनीतून दिसतो समुद्र; पाहा त्याच्या घराचे फोटोज

रोहित-रितिकाने छोट्या समायराची रूमही खूप छान सजवलीय

Rohit Sharma Mumbai House Inside Photos: Mumbai Indians आणि Team India चा कर्णधार रोहित शर्मा एकेकाळी लोकल ट्रेनमध्ये प्रवास करायचा पण आता रोहितचं मुंबईत सारख्या शहरात उच्चभ्रू वस्तीत एक आलिशान घर आहे.

३४ वर्षीय रोहित शर्मा आपल्या कुटुंबासह मुंबईतील वरळी भागात राहतो. त्याच्या अपार्टमेंटच्या समोरच समुद्र आहे.

एका रिपोर्टनुसार, रोहित शर्माने सध्या राहत असलेलं अपार्टमेंट २०१५ साली अंदाजे ३० कोटींना विकत घेतलं होतं.

रोहित शर्मा मुंबईतील ५३ मजली इमारतीत २९व्या मजल्यावर पत्नी रितिका सजदेह आणि मुलगी समायरासोबत राहतो.

या 4 BHK अपार्टमेंटमध्ये अनेक सोयीसुविधा आहेत. रोहितने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून अनेक वेळा घराच्या आतील फोटो शेअर केले आहेत.

रोहित सातत्याने रितिका आणि समायरासोबतचे फोटो, व्हिडिओ अनेकदा शेअर करतच असतो.

रोहितच्या घरातील स्वयंपाकघर संगमरवराने (मार्बल) बनवलेलं आहे. तसेच खास वेगळ्या पद्धतीचं डायनिंग टेबलही आहे.

रोहित शर्माची अपार्टमेंट सी-फेसिंग आहे. त्याच्या घराच्या बाल्कनीतून थेट समुद्र दिसतो.

रोहितच्या घरातील बेडरूमची लाईट व्यवस्था आणि शो-पीस इत्यादींची सजावट रितिकाने स्वत: विशेष डिझायनरकडून करून घेतल्याचं सांगितलं जातं (फोटो- पिंटरेस्ट)

लॉकडाऊनमध्ये रोहित शर्माने घरी समायरा सोबत खेळतानाचे अनेक व्हिडिओ शेअर केले होते. त्यावेळीही अनेकांनी त्याच्या घरातील इंटेरियरचं कौतुक केलं होतं.